नीरव मोदीच्या भावाकडूनही कोट्यवधींची फसवणूक

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

 

स्थैर्य, वॉशिंग्टन, दि.२०: फरार हिरे
व्यापारी नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदीविरोधात अमेरिकेत फसवणुकीचा गुन्हा दाखल
करण्यात आला आहे. नेहल मोदीने मॅनहॅटन येथील एका हिरे कंपनीसोबत मल्टी
लेयर्ड स्कीमच्या माध्यमातून १९ कोटींपेक्षाही अधिक रक्कमेत हेराफेरी केली
असल्याचा आरोप करण्यात आला आहे. हि-यांच्या या कंपनीने नेहलवर २.६ दशलक्ष
डॉलरहून अधिक मूल्यांचे हिरे खरेदी केल्याप्रकरणी सुप्रीम कोर्टात ‘फर्स्ट
डिग्री’ अंतर्गत चोरीचा आरोप लावला आहे.

अमेरिकन कायद्यानुसार, एक दशलक्षाहून अधिक
रक्कमेची चोरी, फसवणूक असेल तर फर्स्ट डिग्रीमध्ये गुन्हा नोंदवला जातो.
मॅनहॅटन डिस्ट्रीक्ट अ‍ॅटर्नी सीव्हाय वेन्स ज्युनिअर यांनी सांगितले की,
नेहल मोदीवर न्यूयॉर्कच्या सुप्रीम कोर्टात फर्स्ट डिग्रीमध्ये मोठ्या
चोरीचा आरोप लावण्यात आला आहे. त्यामुळे आता नेहल मोदीवर न्यूयॉर्कमध्ये
सुप्रीम कोर्टात खटला चालवण्यात येणार आहे. या प्रकरणामुळे नेहल मोदीच्या
अडचणीत वाढ होणार असल्याचे म्हटले जाते.

कोर्टाला सोपवण्यात आलेल्या माहितीनुसार,
नेहल टायटन होल्डिंग्सचे माजी सदस्य नेहल मोदीने मार्च ते ऑगस्ट २०१५
दरम्यान, एका कंपनीसोबत खोटे सादरीकरण करण्यासाठी जवळपास २.६ दशलक्ष
किंमतीचे हिरे एलएलडी डायमंड्सकडून घेतले होते. नेहलला सुरुवातीला एक मोठा
व्यावसायिक म्हणून एलएलडी डायमंड्सचा अध्यक्ष म्हणून ओळख करून देण्यात आली
होती.

मार्च २०१५ मध्ये नेहल मोदी एलएलडी
कंपनीकडे गेला आणि कॉस्टको होलसेल कॉपोर्रेशनसोबत भागिदारी करत असल्याचे
सांगितले. नेहलने न्यूयॉर्कमधील एलएलडी कंपनीला आपल्या काही हि-यांची
आवश्यकता असून कॉस्टकोला विक्री करण्यासाठी काही नमुने दाखवणार असल्याचे
त्यांनी सांगितले. त्यानंतर कंपनीने नेहलकडे हिरे सोपवले. यानंतर नेहलने
कॉस्टको हिरे खरेदी करण्यास तयार असल्याचे एलएलडी कंपनीला सांगितले.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!