कोरेगावनजिक अपघातात बिजवडीचा मोटारसायकलस्वार ठार

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

स्थैर्य, कोरेगाव, दि. ८: कोरेगाव-पुसेगाव रस्त्यावर शहरानजिक कुमठे फाटा येथे ऊस वाहतूक करणार्‍या ट्रॅक्टर-ट्रॉलीच्या मागील चाकाखाली सापडून बिजवडी येथील मोटारसायकलस्वार अभिजित भरत गोसावी, वय २८, याचा जागीच मृत्यु झाला. याप्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत पोलीस ठाण्यातून मिळालेली अधिक माहिती अशी, की बिजवडी येथून सातारा येथे जाण्यासाठी अभिजित भरत गोसावी हा हिरो एच. एफ. डिलक्स मोटार सायकल क्र. एम. एच. ११-सी.पी.-७५१४ वरुन वेगात निघाला होता. कुमठे फाटा येथे त्याने मोटारसायकलला एकदम ब्रेक लावला, त्यात ती घसरली आणि समोरुन जाणार्‍या ट्रॅक्टर-ट्रॉली क्र. एम. एच. ११-सी. डब्ल्यू.- ५२१० खाली अडकली. त्यात डोक्यावरुन चाक गेल्याने गोसावी याचा जागीच मृत्यु झाला. या प्रकरणी कुमठे येथील पोलीस पाटील धनंजय जगदाळे यांनी फिर्याद दिली असून, कोरेगाव पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. उपनिरीक्षक विशाल कदम तपास करत आहेत.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!