जर्नालिस्ट युनियन ऑफ महाराष्ट्रतर्फे भूषण पवार यांचा समाजसेवा पुरस्कार

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

दैनिक स्थैर्य । दि.१० जानेवारी २०२२ । मुंबई । जर्नालिस्ट युनियन ऑफ महाराष्ट्र यांच्या वतीने पत्रकार दिनाच्या औचित्याने मिरारोड कानकीय बेव्हली पार्क येथील बँनक्वेट सभागृहात येथे पार पडलेल्या कार्यक्रमात कोरोना काळात सेवाभावी वृत्तीने काम करणाऱ्या कोरोना योध्दे, समाजसेवक, जनसंपर्कात लक्षणिय कामगिरी करणारे गुणवंत जनसंपर्क अधिकारी आणि दैनिकात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पत्रकारांचा गुणगौरव करण्यात आला. यात दादर येथे राहणारे समाजसेवक भूषण पवार यांना ‘समाजसेवा पुरस्कारा’ने मिरा-भाईंदर महापालिकेच्या महापौर ज्योत्स्ना हसनाळे यांच्या हस्ते शाल-श्रीफळ आणि स्मृती चिन्ह देऊन त्यांच्या निष्ठापूर्वक कामाचा गुणगौरव करण्यात आला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून मिरा भाईंदर पालिकेचे आयुक्त दिलीप ढोले, जर्नालिस्ट युनियन ऑफ महाराष्ट्रचे प्रदेश अध्यक्ष नारायण पांचाळ, सतिश साटम, प्रविण दवणे मुंबई विद्यापीठ प्राध्यापक हेमंत सामंत, विजय मोरे उपस्थित होते. दरम्यान कोरोना काळात निधन झालेल्या पत्रकारांना श्रध्दांजली वाहण्यात आली.

Back to top button
Don`t copy text!