
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य । दि. ०६ फेब्रुवारी २०२३ । सातारा । मौजे कातवडी (मेष्टेवाडी) येथील जलजीवन मिशन सन २०२१-२२ अंतर्गत नवीन पाणी पुरवठा योजनेतील कामाचे भूमिपूजन उत्पादन शुल्क मंत्री तथा पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते संपन्न झाले. मेष्टेवाडीच्या ग्रामस्थांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न या नवीन पाणी पुरवठा योजनेमुळे सुटेल याचा आनंद आहे, अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली. तसेच मतदारसंघातील विकासकामांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असा विश्वास शंभूराज देसाई यांनी याप्रसंगी व्यक्त केला.
यावेळी केरा विभागातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
