दैनिक स्थैर्य | दि. २१ नोव्हेंबर २०२३ | फलटण |
श्री सद्गुरू हरिबुवांच्या कृपेने, संतमहंतांच्या सहकार्याने निराधारांचा आधार असणार्या श्री सद्गुरू प्रतिष्ठान फलटणच्या वतीने समाजातील अकाली वैधव्य आलेल्या निराधार भगिनींना दीपावलीनिमित्त माहेरची एक प्रेमाची व मायेची भेट म्हणून ‘भाऊबीज समारंभ’ बुधवार, दि. २२ नोव्हेंबर २०२२ रोजी सायंकाळी ५.०० वाजता आयोजित केला आहे. हा कार्यक्रम महाराजा मंगल कार्यालय, फलटण येथे संपन्न होणार आहे.
या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून कामधेनू सेवा परिवार इंदापूरचे संस्थापक अध्यक्ष डॉ. लक्ष्मण आसबे हे उपस्थित राहणार असून सद्गुरू व महाराजा संस्था समूह फलटणचे संस्थापक अध्यक्ष श्री. दिलीपसिंह भोसले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत.
यावेळी बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन श्री सद्गुरू प्रतिष्ठान फलटणकडून करण्यात आले आहे.