दैनिक स्थैर्य | दि. २७ जानेवारी २०२४ | फलटण |
फलटण येथे प्रजासत्ताक दिनी भारत माता पूजन व कारसेवकांचा सन्मान राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल व सकल हिंदू समाज कृती समिती यांच्या विद्यमाने गणेश मंदिर स्वामी विवेकानंद नगर येथे संपन्न झाला.
प्रमुख पाहुणे डॉ. जे. टी. पोळ, डॉ. तुकाराम गायकवाड (लायन्स क्लबचे अध्यक्ष), कारसेवक हरिभाऊ तात्याबा शिंदे, कृष्णात चंद्रकांत बोराटे, दिलीप भिसे, कै. तुकाराम महादेव घाडगे यांचे पुत्र यश तुकाराम घाडगे यांनी पुरस्कार स्वीकारला.
यावेळी बोलताना कृष्णात बोराटे म्हणाले की, १९९२ साली आम्ही कारसेवक म्हणून अयोध्येला गेलो होतो. त्यावेळी खूप मोठी दंगल झाली आणि आम्ही दोन दिवस जेलमध्ये होतो. त्यांनी त्यावेळेचा प्रसंग सांगितला, तो अंगावर शहारे आणणारा होता.
प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना डॉ. जे. टी. पोळ म्हणाले की, सर्व कारसेवकांचा व त्यांच्या कुटुंबियांचाआमच्या दवाखान्यामार्फत ओपीडी फ्री आणि सर्व दवाखान्याचा खर्च ५० % फ्री तसेच लायन्स क्लबतर्फे संपूर्ण मोतीबिंदू शस्त्रक्रिया व लेन्सचा खर्च संपूर्ण फ्री करण्यात आला आहे.
डॉ. प्रशांत निंबाळकर (राष्ट्रीय स्वयंसेवक संघ), अॅड. शरद जगदाळे (विश्व हिंदू परिषद, बजरंग दल), अॅड. अमोल जाधव, श्री. गणेश घनवट (विश्व हिंदू परिषद, बजरंग दल), श्री. संदीपकुमार जाधव, उद्धव बोराटे, अजय शिंदे, आशिष कापसे, मंगेश खंदारे, प्रमोद खताळ यावेळी उपस्थित होते.