दैनिक स्थैर्य | दि. १६ सप्टेंबर २०२४ | फलटण |
निरगुडी गावातील महात्मा फुले नगर येथे गणेशोत्सवानिमित्त विद्यार्थ्यांना शालोपयोगी वस्तूंचे वाटप आणि मंडळातील ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करून केली. प्रास्ताविक महेंद्र गोरे यांनी केले.
होलार समाज यंग ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष हनुमंत केंगार यांनी मनोगत व्यक्त करताना मंडळाचे कौतुक केले. भैरवनाथ तरुण मंडळ हे नेहमीच सामाजिक बांधिलकेची जाणीव ठेवून पर्यावरणपूरक गणेशोत्सव, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध स्पर्धा, शालोपयोगी वस्तूंचे वाटप, महिलांचा सन्मान, ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान असे अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात अग्रेसर असल्याने हे मंडळ सातारा जिल्ह्यातील एक आदर्श मंडळ आहे, असे सांगून कार्यकर्त्यांचे कौतुक करुन सन्मानचिन्ह दिले.
या कार्यक्रमासाठी राष्ट्रीय मजदूर संघाचे बारामती लोकसभा अध्यक्ष शशिकांत गेजगे, प्रदिप मोहिते, रणमोडे साहेब, सातारा सम्राटचे कार्यकारी संपादक प्रशांत सोनवणे, होलार समाजाचे फलटण तालुकाध्यक्ष गणेश गोरे, युवक नेतृत्व राहुल करे, युवक नेतृत्व संदिप गोरे, फलटण तालुका उपाध्यक्ष ओमकार अहिवळे, योगेश गोरे यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते.
यावेळी पत्रकार सूरज गोरे यांनी नव्याने सुरू केलेल्या राजधानी एक्सप्रेस न्यूज या न्यूज चॅनेलचे लोकार्पण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
आभार पत्रकार सूरज गोरे यांनी मानले. या कार्यक्रमासाठी मंडळाचे ज्येष्ठ महादेव गोरे, तानाजी गोरे, निलकुमार गोरे, अनिल गोरे (मोरया डेकोरेशन), अध्यक्ष अजित गोरे, उपाध्यक्ष संतोष गोरे, भिकाजी गोरे, सुनिल गोरे, संदिप गोरे, खजिनदार अजित गोरे, गणेश गोरे, प्रविण गोरे, बबन आवटे, दशरथ गोरे, यश गोरे, देवराज गोरे, अक्षय आवटे, लहू गोरे, शंभूराज गोरे, अमित आवटे, आदेश गोरे, शुभम गोरे तसेच मंडळातील ज्येष्ठ नागरिक, महिला उपस्थित होत्या.