दैनिक स्थैर्य | दि. ११ ऑक्टोबर २०२३ | फलटण |
भाडळी बु. (ता. फलटण) मध्ये शेतकरी बांधवांच्या मागणीवरून विद्युत वितरण विभाग विडणीचे कनिष्ठ अभियंता श्री. सदाशिव गंगावणे तसेच वरिष्ठ तंत्रज्ञ श्री. दस्तगीर शेख यांनी प्रत्यक्ष भेट देऊन शेतीपंपाच्या संबंधी येणार्या अडचणी सोडविण्यासाठी जवळपास सर्वच वीजपुरवठा डि.पीं.ची पाहणी करून यापुढील काळात आवश्यक तेथे नवीन डी.पी., योग्य दाबाने वीजपुरवठा होणे तसेच डी.पीं.ची दुरूस्ती याबाबतीत लवकरच मार्ग काढण्याची ग्वाही दिली.
गेली अनेक वर्ष या परिसरातील शेतकर्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.विहीर आणि कूपनलिका यामध्ये पुरेसा पाणीसाठा असूनही विजेचा योग्य दाब न मिळाल्याने पिकांना पाणी देता येत नाही. तसेच या भागातील अनेक डि.पीं.ची दूरवस्था झाल्याने शेतकर्यांना अनेक प्रसंगांना तोंड द्यावे लागत आहे. यानिमित्ताने प्रथमच भाडळी- सासकल परिसरात अधिकारी वर्ग आला असल्याने त्यांचे ग्रामस्थांनी स्वागत केले.
यावेळी भाडळीच्या मातोश्री विकास सोसायटीचे चेअरमन श्री. मोहनराव डांगे, श्री. राजेंद्र फुले, श्री. हरिदास सावंत, श्री. शिवाजी शेंडे, श्री. अरुण मुळीक, श्री. बाळासाहेब शेंडे, श्री. सचिन शिरतोडे, श्री. काशिनाथ डांगे, श्री. उत्तम डांगे, श्री. संजय डांगे, श्री. राम भोईटे, सुनील खरात, ऋषी भोईटे, स्वप्नील शेंडे, धर्मेंद्र शिरतोडे, हर्षद डांगे, गणेश डांगे, विक्रांत भोसले, तेजस दडस संबंधित शेतकरी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.