भाडळी बु. येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी


दैनिक स्थैर्य | दि. २२ एप्रिल २०२४ | फलटण |
भाडळी बु. येथे भीमज्योत तरुण मंडळाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी मातोश्री विकास सोसायटीचे चेअरमन श्री. मोहनराव डांगे, माजी उपसरपंच श्री. दत्तात्रय डांगे, ग्रामपंचायत सदस्य अनुक्रमे श्री. मंगेश माने, श्री. सचिन शिरतोडे यांच्यासह श्री. महादेव माने, श्री. शंकर माने, श्री. आबासो माने, श्री. ऋषिकेश भोईटे, श्री. मिलिंद माने, श्री. सनी माने, श्री. नटराज साळवे, चि. विक्रांत भोसले इ. उपस्थित होते.

प्रतिमा पूजनानंतर मान्यवरांनी मनोगते व्यक्त केली. यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेतला. गावातील मुख्य मार्गावरून प्रतिमांची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली.

प्रास्ताविक चि. प्रतिक माने यांनी केले. मान्यवरांचे स्वागत श्री. संग्रामसिंह माने, प्रसाद माने यांनी तर आभार चि. अभिमान माने यांनी मानले.


Back to top button
Don`t copy text!