प्रवीण जगताप यांना बेस्ट व टॉप फोटो अवॉर्ड

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २३ जून २०२२ । बारामती । बारामती मधील वाईल्ड लाईफ फोटो ग्राफर प्रवीण जगताप यांना जागतिक स्तरावरील बेस्ट फोटो आणि टॅाप फोटोग्राफर म्हणुन या दोन्ही मध्ये दुसरा क्रमांक आल्याने लवकरच उत्कृष्ट फोटो ग्राफर म्हणून रशिया मध्ये गौरविण्यात येणार आहे. प्रवीण जगताप यांनी साधारन पाच वर्षांपुर्वी फोटोग्राफी सुरू केली. यामध्ये सुरवातीच्या काळात बारामती परिसरातील पक्षांचे फोटो काढन्यासाठी फिरायला सुरूवात केली, त्याच बरोबर मग अनेक जंगलात उदा. ताडोबा, नागझिरा, पेंच, कान्हा, बांधवगड, हिमालयातील किब्बर, सत्ताल , अशा अनेक जंगलात फोटोसाठी फिरले.

हे फिरत असताना आपल्या आजुबाजुला पन निसर्गात माळरानावर लांडगे , कोल्हे, तरस (Heyna ) असे बरेच प्राणी आढळतात.
मग या प्रान्याविषयी चांगल्या प्रकारे काम करन्याच ठरवल. लांडगा हा याला माळरानचा राजा असही संबोधतात. अलिकडे औधोगिकीकरनाच्या नावाखाली माळरानांवरती जी प्लॅाटिग झालेली आहेत त्यामुळे या सर्वाचा रहीवास तसा विस्कळीत झालेला आहे.
बारामती, दौड, सासवड, फलटन, सातारा, कर्जत ,अहमदनगर, सोलापुर…. अशा अनेक ठिकानच्या माळरानांवरती लांडगा आढळतो. पुर्वी लांडगा फक्त शिकार करून आपला ऊदरनिर्वाह करत परंतू अलिकडच्या काळात पोल्ट्री वेस्टेजवरती म्हनजे मेलेल्या कोबड्यांवरती ५० ते ६० % ते यावरतीच अवलंबुन असतात.

साधारन ४ वर्ष मी आपल्या आसपासच्या माळरानांवरती फिरून त्यांची फोटोग्राफी करून त्यांचा अभ्यास करत आहे. याच आपल्या माळरानच्या राजाचा एक फोटो इंटरनॅशनल अवार्ड थर्टी फाईव्ह जगामधली सर्वात मोठी फोटोग्राफी स्पर्धा. विवाध गटात अनेक स्पर्धक सहभागी होतात १७४ देशांमधले १,२५,००० स्पर्धकांनीनी भाग घेतला यांत ४,७०,५०० फोटों आले होते. यांच एक मॅगझीन दर वर्षी येत
यामध्ये विवीध गट असतात. यामध्ये बेस्ट फोटो आणि टॅाप फोटोग्राफर म्हणुन या दोन्ही मध्ये दुसरा क्रमांक देण्यात आला आहे.
एनव्हायरमेट फोरम ॲाफ इंडीयाच्या वतिने जागतिक पर्यावरन दिन निमीत्त अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या हस्ते सम्मानित करन्यात आल.
एनव्हायरमेट फोरम ॲाफ इंडीयाच्या समवेत लांडगा या विषयावर एक लघुपट तयार करीत आहेत लवकरच ती प्रदर्शित होईल.


Back to top button
Don`t copy text!