
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य । दि. २० डिसेंबर २०२२ । सातारा । जुन्या वादातून एकास मारहाण केल्याप्रकरणी सहा जणांवर रहिमतपूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
दिनांक 17 डिसेंबर रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास तारगाव तालुका कोरेगाव हद्दीत राजमुद्रा हॉटेलच्या पटांगणात जुन्या वादाच्या कारणातून प्रत्येक लक्ष्मण मोरे वय 19 रा. तारगाव, ता. कोरेगाव याला ओंकार जगदाळे वय 20, वेदांत जगदाळे वय 20, सौरभ जगदाळे वय 19, आदित्य जगदाळे आणि अनोळखी दोघांनी शिवीगाळ दमदाटी करून हाताने, लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आहे. या घटनेची नोंद रहिमतपूर पोलीस ठाण्यात झाली असून पोलीस उपनिरीक्षक व्ही आर. खुडे अधिक तपास करीत आहेत.
