जुन्या भांडणातून एकास मारहाण

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य । दि.३१ जानेवारी २०२२ । सातारा । जुन्या भांडणाचा राग मनात धरुन फिर्यादीस मारहाण करुन शिवीगाळ, दमदाटी करुन त्यास दगडाने मारहाण करुन जखमी केले. ही घटना २७ रोजी ढगेवाडी ता. सातारा येथील आयटीडी कंपनीच्या जुन्या गेट समोर घडली. या प्रकरणी दोघांविरुध्द सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.

याबाबतची सातारा तालुका पोलीस स्टेशनमधून देण्यात आलेली माहिती अशी, दि. २७ जानेवारी रोजी सायंकाळी सव्वा सात वाजण्याच्या दरम्यान जुन्या भांडणाचा राग मनात धरुन मारहाण केली. याप्रकरणी राहुल बरकडे रा. ढगेवाडी यांनी दि. २९ रोजी तक्रार दिल्यानंतर सोमनाथ सिध्देश साबळे, सागर जाधव दोघे रा. ढगेवाडी यांच्याविरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला. याबाबतचा अधिक तपास सहाय्यक फौ. बागवान हे करत आहेत.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!