स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • फलटण शहर
  • फलटण तालुका
  • सातारा जिल्हा
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • संपर्क
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result

मुलीचा ताबा देण्यावरून पत्नीचे अपहरण करून बेदम मारहाण, सातारा येथील घटना : पतीसह एकावर गुन्हा दाखल

Team Daily Sthairya by Team Daily Sthairya
March 27, 2021
in सातारा जिल्हा

स्थैर्य, सातारा, दि.२६: घटस्फोटाचा दावा सुरू असतानाच पतीने मुलीच्या ताबा देण्यावरून पत्नीस सातारा येथून हातपाय बांधून गाडीतून पळवून नेले व तिला अक्कलकोटपर्यंतच्या प्रवासात मारहाण केली व मुलीचा ताबा न दिल्या जीवे मारण्याची धमकी दिली. विशेष म्हणजे त्याने पहिले लग्न झाल्याचे लपवून संबंधित महिलेशी दुसरे लग्न केले आहे. याप्रकरणी संशयित तानाजी गणेश गोरे रा. टेंभूर्णी रोड, गोरे वस्ती, कुर्डू, ता. माढा याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत सौ. स्नेहल गोरे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, तानाजी गणेश गोरे याने त्याचा पहिला विवाह झाल्याची माहिती लपवून स्नेहल गोरे यांच्याशी फसवून विवाह केला होता. त्यांना कु. तेजस्वी नावाची एक मुलगी आहे. तानाजी आणि स्नेहल यांच्यात घटस्फोटाचा दावा सध्या सुरू आहे. असे असताना तानाजी गोरे आणि विठ्ठल माळी (पूर्ण नाव माहित नाही.) यांनी संगनमत करून सौ. स्नेहल गोरे यांना सातार्‍यात बॉम्बे रेस्टॉरंंटनजिक कारमध्ये जबरदस्तीने बसवले. त्यांचे हातपाय बांधून गाडी अक्कलकोटच्या दिशेने नेली. सातारा ते अक्कलकोटच्या प्रवासादररम्यान त्यांना मारहाण करण्यात आली. तसेच सौ. स्नेहल यांची आई प्रमिला यांना फोन करून मुलगी कु. तेजस्वी हिचा ताबा दिला नाही तर स्नेहल यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली.

याप्रकरणी तानाजी गोरे आणि विठ्ठल माळी यांच्यावर गुन्हा दाखल झाला असून तपास रोकडे करत आहेत.


📣 दैनिक स्थैर्य आता टेलिग्रामवर आहे. दैनिक स्थैर्यच्या अधिकृत टेलिग्राम चॅनेलला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करावे.

ADVERTISEMENT
Previous Post

७४० जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांची कोरोनावर मात; कर्मचाऱ्यांचे धैर्य कौतुकास्पद : जाधव

Next Post

इंधन व गॅसच्या बेसुमार दरवाढीविरोधात काँग्रेसचे सातार्‍यात आंदोलन, मोदी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी

Next Post

इंधन व गॅसच्या बेसुमार दरवाढीविरोधात काँग्रेसचे सातार्‍यात आंदोलन, मोदी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी

ताज्या बातम्या ई-मेलवर मिळवा

Join 1,033 other subscribers

जाहिराती

ताज्या बातम्या

पुष्कर मंगल कार्यालय येथे कोव्हीड केअर सेंटर उभारणी करताना आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, श्रीमंत छ. सौ. वेदांतिकाराजे भोसले, डॉ. ऋतुराज देशमुख व मान्यवर

रुग्णसेवेसाठी पुष्कर कोव्हीड केअर सेंटर पुन्हा सज्ज ८० बेडच्या सेंटरमध्ये ३२ बेड ऑक्सिजन युक्त

April 23, 2021

आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी 7 व्यवसायिकांवर गुन्हा दाखल

April 23, 2021

जबरी चोरीप्रकरणी एकावर गुन्हा

April 23, 2021

सदर बझार येथे फ्लॅटमधून 12 हजारांचा ऐवज चोरीस

April 23, 2021

जुगार अड्ड्यांवर धाडी, 36 हजारांचा मुद्देमाल जप्त

April 23, 2021

शेतात अतिक्रमण करून दीड लाखाचे नुकसान; तिघांवर गुन्हा दाखल

April 23, 2021

जिल्ह्यातील अंत्योदय, प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांना मोफत धान्य जिल्हाधिकारी शंभरकर यांची माहिती

April 22, 2021

५४% भारतीय विद्यार्थी म्हणतात ऑनलाइन शिक्षणाचे मॉडेल सोयीस्कर : ब्रेनली

April 22, 2021

पालकमंत्र्यांची मालखेड येथील रोपवाटिकेला भेट; रोजगार हमी योजनेच्या कामाची केली पाहणी

April 22, 2021

ऑक्सिजन गळती प्रकरणाचा तपास करणार विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय समिती

April 22, 2021
Load More

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

  • Home
  • संपर्क

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • फलटण शहर
  • फलटण तालुका
  • सातारा जिल्हा
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • संपर्क

Website maintained by Tushar Bhambare.

कॉपी करू नका.