माहेरहून पैसे आणण्यासाठी विवाहितेला मारहाण; मारहाणीत गर्भपात झाल्याचे उघड

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 

स्थैर्य, फलटण दि.७ : शेतीसाठी, नोकरीसाठी आणि गायीच्या गोठ्याच्या बांधकामासाठी माहेरहून 5 लाख रुपये आणावेत या कारणासाठी विवाहितेला मारहाण करुन या मारहाणीत विवाहितेचा गर्भपात झाला असल्याची फिर्याद फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. दरम्यान या प्रकरणात संबंधित विवाहितेचा पती व सासरा यांना अटक करण्यात आली आहे.

याबाबत फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनकडून मिळालेली माहिती अशी की, उपळवे ता. फलटण व हल्ली राहणार धुळदेव ता. फलटण येथील मनिषा गणपत बिचुकले वय 22 यांना दि. 1 नोव्हेंबर 2017 ते 23 सप्टेंबर 2020 या कालावधीमध्ये सासरी शेतीला भांडवलासाठी, गायीच्या गोठ्याचे काम करण्यासाठी तसेच नोकरीसाठी माहेरहुन पाच लाख आणत नाही तसेच इतर कारणावरुन वेळोवळी शाररीक व मानसिक छळ व जाचहाट व मारहाण करुन शिवीगाळ दमदाटी केली असल्याची फिर्याद मनिषा बिचुकले यांनी दिली. 

त्यांच्या फिर्यादिनुसार मनिषा बिचुकले यांचा पती गणपत हणमंत बिचुकले यांनी दिनांक 18 जानेवारी 2020 रोजी त्यांना तुला कोठे मुलबाळ होतेय, तु वाझोंटी आहे असे म्हणत मारहाण केली. तसेच दिनांक 1 जुलै 2020 रोजी सकाळी 8.30 वा.चे सुमारास त्यांना पती गणपत बिचुकले यांनी वरील कारणावरुन व जेवणाचा डबा वेळेवर तयार न झाल्याच्या कारणावरुन त्या पाच महिन्यांची गरोदर असताना देखील पोटावर लाथाबुक्क्याने जबर मारहाण केली. यामुळे मनिषा यांचा गर्भपात झाला. 

सदर गुन्ह्याच्या तपासात वैद्यकिय अधिकारी यांच्याकडे केलेल्या तपासाअंती व मनिषा यांनी सादर केलेल्या उपचाराच्या कागदपत्रावरुन व यातील त्यांनी पुन्हा दिलेल्या पुरवणी जबाबावरुन मनिषा बिचुकले यांच्या पोटावर नवरा गणपत याने मारहाण केलेने गर्भपात झालेचे निष्पन्न झाल्याने या गुन्हयात आरोपीवर भादविसं कलम 316 हे वाढीव कलम लावण्यात आले असल्याचे फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनकडून सांगण्यात आले. 

तसेच सदर प्रकरणात सासरा हणमंत आनंदराव बिचुकले वय 58 वर्ष, सासु सौ.रंजना हणमंत बिचुकले सर्व रा.उपळवे ता.फलटण, नणंद अनिता अशोक चोरमले, नंदावा अशोक ऊर्फ तात्या विलास चोरमले रा.सस्तेवाडी, ता.फलटण, नणंद सोनाली संतोष काळे, नंदावा संतोष गुलाब काळे रा.काळे वस्ती वडुज, ता. खटाव, नणंद शितल आप्पा तांबे, नंदावा आप्पा सिताराम तांबे रा.तांबेवस्ती, पिंपळवाडी, साखरवाडी, ता.फलटण यांच्याविरोधात मनिषा बिचुकले यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा नोंद झाला आहे. या पैकी पती व सासरे यांना अटक करण्यात आली आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आधिक तपास पोलीस निरीक्षक नितिन सावंत हे करीत आहेत.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!