बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प थांबणार नाही – गृहनिर्माणमंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि.०५ एप्रिल २०२२ । मुंबई । ना. म. जोशी मार्ग येथील बीडीडी चाळीचे काम कोणत्याही परिस्थितीत थांबणार नाहीअशी ग्वाही गृहनिर्माणमंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी दिली. बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाच्या कामांची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी ते प्रकल्पस्थळी आले होते. यावेळी उपस्थित चाळवासियांसोबत त्यांनी संवाद साधला.

यावेळी आमदार सुनील शिंदे, गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव मिलींद म्हैसकरम्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल डिग्गीकरमुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाचे मुख्य अधिकारी डॉ. योगेश म्हसे उपस्थित होते.

मंत्री डॉ. आव्हाड म्हणाले, इथल्या रहिवाशांना जुन्या 180 चौरस फुटाच्या घरातून 500 चौरस फुटाच्या घरात जायला मिळणार आहे. पक्की आणि सुसज्ज घरे मिळणार आहेत. पुढची पिढी चांगल्या वातावरणात वाढली पाहिजे ही शासनाची इच्छा आहे. करार तयार करताना सगळ्यांच्याच मागण्यांचा विचार करण्यात आला आहे. वेळेत प्रकल्प पूर्ण करायचा आहे. ज्या इमारती रिकाम्या करायच्या आहेत त्या रिकाम्या करून द्याव्यात. पावसाळ्याच्याआधी त्या इमारती पाडल्या जातील.

आम्ही पण चाळीतूनच आलो आहोत. कोणाचीही फसवणूक होणार नाही. काही लोक या प्रकल्पात आडकाठी आणत असतील तर ते खपवून घेतले जाणार नाही. यापूर्वी 281 कुटुंब स्थलांतरीत झाले आहेत तर 68 लोकांनी करारपत्र करूनही अद्याप घर सोडले नाहीया लोकांनी सहकार्य करावे, असे आवाहनही डॉ. आव्हाड यांनी केले.


Back to top button
Don`t copy text!