
थेट WhatsApp वर मिळवा
राज्यातील पडीक आणि सरकारी जमिनींवर जनावरांसाठी चारा लागवड करण्यास शासनाकडून अधिकृत मंजुरी देण्यात आली असून, या निर्णयामुळे पशुपालक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
स्थैर्य, सातारा, दि. १३ नोव्हेंबर : शासनाच्या नव्या धोरणानुसार आता पडीक, गायरान व शासकीय जमिनींवर चारा पिकांची लागवड केली जाणार आहे. यामुळे राज्यातील चारा टंचाईचा प्रश्न मार्गी लागण्यास मोठी मदत होणार असून, दूध उत्पादक व पशुपालकांसाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.
७ चारा पिकांच्या लागवडीला हिरवा कंदील
शासनाच्या या विशेष योजनेअंतर्गत पडीक आणि सरकारी जमिनींवर एकूण ७ प्रमुख चारा पिकांच्या लागवडीस मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये जनावरांसाठी पोषक ठरणारे बहुवार्षिक गवत, मका, ज्वारी आणि इतर उच्च पौष्टिक चारा पिकांचा समावेश आहे. या पिकांच्या लागवडीमुळे गावांमधील गोवंश आणि दुभत्या जनावरांसाठी वर्षभर चारा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.
अनुदान आणि आर्थिक मदत
चारा लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि पडीक जमिनींचा योग्य वापर करण्यासाठी शासनाकडून विविध योजनांच्या माध्यमातून आर्थिक अनुदान उपलब्ध करून दिले जात आहे. बियाणे, लागवड खर्च आणि जलसंवर्धनासाठी योग्य निधी मिळल्यामुळे ग्रामीण भागातील चारा विकास कामांना अधिक गती मिळणार आहे.





