बँकांचे कामकाज 11 ते 1 यावेळेत सुरु – जिल्हादंडाधिकारी शेखर सिंह यांनी केले आदेश जारी

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

स्थैर्य, सातारा, दि.२४: सहकारी सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम व खासगी बँका, सहकारी बँका दि. 22 मे 2021 रोजीच्या आदेशान्वये 1 जून 2021 रोजी सकाळी 7 वाजेपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. तथापी जिल्हादंडाधिकारी शेखर सिंह यांनी दि. 25 मे 2021 रोजीपासून 1 जून रोजीच्या सकाळी 7 पर्यंत या कालावधीत फक्त एटीएममध्ये पैसे भरणे, चेक क्लिअरन्स, डाटा सेंटरशी संबंधित बँकांचे कामकाज कार्यालयीन कामकाजादिवशी सकाळी 11 ते दुपारी 1 या कालावधीत चालू ठेवण्यास परवानगी दिली आहे. तसेच बँकांचे सर्व उर्वरित कामकाज पूर्णपणे बंद राहील याबाबतचे आदेश जिल्हादंडाधिकारी शेखर सिंह यांनी आज जारी केले आहेत.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!