
दैनिक स्थैर्य । दि. ०२ मार्च २०२३ । मुंबई । भारतातील अग्रगण्य आणि वैविध्यपूर्ण वित्तीय सेवा समूहांपैकी एक असलेली बजाज फिनसर्व्ह लिमिटेड कंपनी विविध दिव्यांग व्यक्तींना हायटेक मोबिलिटी सोल्युशन्स प्रदान करून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणून सक्षम करण्यास पुढाकार घेणार आहेत.
‘अक्सेसेबिलिटी अँड फ्रिडम ‘हा उपक्रम बजाज फिनसर्व्ह च्या सामाजिक जबाबदारी कार्यक्रमाचा एक भाग आहे.ज्याचा उद्देश मुलांसाठी आणि तरुणांसाठी न्याय आणि सर्वसमावेशक संधी उपलब्ध करून देणे हा आहे. वेगवेगळ्या दिव्यांग व्यक्तींच्या जीवनात सुधारणा करण्यासाठी काम कारणाऱ्या राउंड टेबल इंडियाच्या भागीदारीत बजाज आलियान्झ जनरल इन्शुरन्स कंपनी त्यांच्या उपकंपनी द्वारे हा निधी उभारून या उपक्रमास चालना देत आहेत. या उपक्रमांतर्गत बजाज फिनसर्व्ह कडून भारतभरातील प्राप्तकर्त्यांना २०० हायटेक मोबिलिटी सोल्युशन्स प्रदान केले जातील
या प्रसंगी बजाज फिनसर्व्ह सीएसआर सुकाणू समितीच्या अध्यक्ष शेफाली बजाज म्हणाल्या, ”हा उपक्रम दिव्यांगांच्या जीवनात परिवर्तन घडविणारा आहे. लहान मुलं आणि तरुणांना संसाधने, आरोग्य यामध्ये समान प्रवेश देऊन त्यांचा शिक्षण आणि संधी क्षेत्रात समावेश वाढविण्याचा आमच्या प्रयत्नांचा हा एक भाग आहे.”
बजाज अलियान्झ जनरल इन्शुरन्स कंपनीचे एमडी आणि सीईओ तपन सिंघेल म्हणाले, “समूह म्हणून, बजाज फिनसर्व्हने नेहमीच समाजाला परत देण्यावर आणि समुदायांवर सकारात्मक प्रभाव पाडण्यावर विश्वास ठेवला आहे. व्हीलचेअर वापरणाऱ्या अनेक भारतीयांना त्यांच्या नित्य जीवनात असंख्य आव्हानांचा सामना करावा लागतो, त्यांच्या करिअरच्या संधींवर मर्यादा येतात. या उपक्रमाचा एक भाग म्हणून, आम्ही २०० हाय-टेक मोबिलिटी दान केली आहेत. आम्ही समाजात बदल घडवून आणण्याचा आणि या देशातील नागरिकांच्या कल्याणासाठी योगदान देण्याचा प्रयत्न करत आहोत जेणेकरून ते सन्मानाने जीवन जगू शकतील. “