बहुजन समाज पार्टी फलटण विधानसभा अध्यक्ष पदी गौतम भोसले यांची निवड


दैनिक स्थैर्य । दि. ०१ ऑक्टोबर २०२२ । सातारा । बहुजन समाज पार्टी चे राष्ट्रीय कोऑर्डिनेटर मा.आकाश आनंद जी यांच्या मुंबई येथे ९ नोव्हेंबर २०२२ रोजी होणाऱ्या कार्यक्रम च्या पार्श्वभूमीवर दिनांक २९/०९/२०२२ रोजी सर्किट हाऊस सातारा येथे मा. काळुराम चौधरी (पश्चिम महाराष्ट्र झोन प्रभारी) बहुजन समाज पार्टी यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा जिल्हा समिक्षा बैठक संपन्न झाली.

या समिक्षा बैठकीत बहुजन समाज पार्टी च्या फलटण विधानसभेच्या अध्यक्षपदी गौतम कुंडलिक भोसले राहणार सस्तेवाडी (दातेवस्ती) यांची निवड करण्यात आली.

यावेळी सातारा जिल्हा प्रभारी मा. उदय काकडे, सातारा जिल्हा अध्यक्ष किरण सावंत, सातारा जिल्हा उपाध्यक्ष संदिप पवार, जेष्ठ मार्गदर्शन दादासाहेब गायकवाड, माजी नगरसेवक तथा माजी प्रभारी अमर गायकवाड यांचेसह फलटण, सातारा,मान,वाई, पाटण, कराड कोरेगाव विधानसभेतील आजी-माजी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

फलटण विधानसभेमध्ये फुले ,शाहू, आंबेडकर यांच्या समतावादी विचारधारेचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी संविधानाच्या चौकटीत राहून धर्मनिरपेक्ष पणे काम करून लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी मानवतावादी विचारांच्या युवकांना संघटनेत येण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे स्पष्ट केले.

गौतम भोसले यांच्या निवडीबद्दल त्यांचे सहकारी मा. फलटण विधानसभा अध्यक्ष प्रेम मोरे, प्रभारी मंगेश मोरे , प्रविण विटकर, दिनेश कांबळे, सुहास काकडे, यांनी अभिनंदन केले आहे.


Back to top button
Don`t copy text!