जीवे मारण्याच्या उद्देशाने बाप-लेकाचे अपहरण वाठार स्टेशन येथील घटना; वाठार स्टेशन पोलिसांच्या तत्परतेमुळे बापलेकाची सुटका व संशयित ५ आरोपी गजाआड


 

     संशयितांनी याच गाडीतून बापलेकाचे अपहरण केले होते.

स्थैर्य, पिंपोडे बुद्रुक, दि,९: वाठार स्टेशन येथील राहत्या घरा समोरून मध्यप्रदेश येथील पाच युवकांनी कल्याण दत्तात्रय भोईटे वय वर्ष ४० मुळगाव हिंगणगाव ता.फलटण सध्या रा.वाठार स्टेशन व त्यांचा लहान मुलगा वय वर्ष ११ या दोघा बाप लेकाची अपहरण केल्याची घटना पोलिसांच्या सतर्कतेमुळे उघडकीस आली. सविस्तर वृत्त असे वाठार पोलीसांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार कल्याण दत्तात्रय भोईटे यांचा भाजीपाला खरेदी-विक्रीचा व्यवसाय असून त्यांनी ३ ते ४ तारखे दरम्यान च्या काळात मध्यप्रदेश येथून २ ट्रक वाटाणा मागवला होता मागवलेल्या मालाचे बिल त्यांनी अदा केले नव्हते. संबंधित थकीत बिलाची वसुली करण्यासाठी मध्य प्रदेश येथून १)दिनेश रामलालजी धाकड वय वर्षे ३१ रा.अमोदीया रतलाम मध्य प्रदेश, २)मुकेश सत्यनारायण पटेल वय वर्ष ३० रा.कारोदा मध्य प्रदेश, ३)रवींद्र रामलालजी धाकड वय वर्ष २३

अमोदीया,रतलाम मध्य प्रदेश, ४)मानक गोविंदलालजी धाकड वय वर्ष ३० अमोदीया रतलाम मध्य प्रदेश, ५)नितीन मोहनलालजी हाडे वय वर्ष २७ रा. कारोदा मध्य प्रदेश हे सर्व ५ संशयित मारुती सुझुकी कंपनीची इको व्हॅन क्रमांक MP04- CL 8851 गाडी घेऊन वाठार स्टेशन येथे आले होते त्यांनी सोमवार दिनांक ७ डिसेंबर २०२० रोजी दुपारी ३ वा.च्या सुमारास कल्याण भोईटे व त्यांचा लहान मुलगा या दोघांना वाठार स्टेशन येथील राहत्या घरासमोरून ठार मारण्याच्या उद्देशाने जबरदस्तीने अपहरण करून गाडीमध्ये घालून गाडी कुठेही न थांबवता नारायणगाव ता.जुन्नर जि, पुणे या दिशेने घेऊन गेले. गाडी मधून जात असताना सदरच्या अपहरण केलेल्या संशयितांनी थकीत बिलाच्या कारणास्तव भोईटे व त्यांच्या मुलाला शिवीगाळ व दमदाटी केली. दरम्यानच्या काळात अपहरण केलेल्या गाडी मधूनच गुपचूपपणे भोईटे यांनी आपल्याकडे असणाऱ्या मोबाईल वरून त्यांच्या नातेवाईकांना माझे व माझ्या मुलाचे अपहरण झाल्याचा मेसेज टाकला होता मेसेज पाहताच नातेवाईकांनी तातडीने सदरची माहिती पोलिसांना दिली. मोबाईलच्या लोकेशन वरून पोलिसांनी तत्पर गतिमान तपास केला व संबंधित अपहरण केलेल्या संशयित आरोपींचे पुणे येथे जाऊन त्यांच्या मुसक्या आवळल्या व अपहरण झालेल्या बाप लेकाला सुखरूप वाठार स्टेशन येथे आणले व संशयित आरोपींना सुद्धा गजाआड केले.अपहरण झाल्याची तक्रार वाठार पोलीस स्टेशनला फिर्यादीने दिली असून पुढील तपास वाठार पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील घोंगडे करीत आहेत. संबंधित गुन्ह्यातील पाच संशयित आरोपींना आज दिनांक ९ डिसेंबर रोजी वाठार स्टेशन पोलिसांनी कोरेगाव न्यायालयात हजर केले असता सदरच्या संशयित आरोपींना न्यायालयाने ११ तारखेपर्यंत पोलिस कस्टडी सुनावली आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!