अझीम प्रेमजींनी दररोज 22 कोटींच्या दिल्या देणग्या; अ‍ॅडलगिव्ह आणि हुरून इंडियाने जारी केली 2020 परोपकारी व्यक्तींची यादी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 

स्थैर्य, दि.११: माहिती तंत्रज्ञान कंपनी
विप्रोचे मालक अझीम प्रेमजी यांनी या वेळी अ‍ॅडलगिव्ह हुरून इंडियाच्या
२०२० च्या परोपकारी व्यक्तींच्या यादीत अव्वल स्थान प्राप्त केले आहे. अझीम
प्रेमजी यांनी सरासरी दररोज २२ कोटी रुपये दान केले आहेत.

एचसीएल
टेक्नॉलॉजीचे चेअरमन शिव नाडर दुसऱ्या क्रमांकावर आहेत. भारताचे सर्वात
श्रीमंत व्यक्ती आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी तिसऱ्या
क्रमांकावर आहेत. हुरून इंडिया आणि अॅडलगिव्हने आपली २०२०ची भारतीय
दानशूरांची यादी जारी केली आहे. ही भारतातील सर्वाधिक दातृत्व असणाऱ्या
लोकांची सातवी वार्षिक क्रमवारी आहे. देशात सर्वाधिक दान करणारे वैयक्तिक
दात्यांना समोर आणण्याच्या उद्देशाने यादी प्रकाशित केली जाते. २०२० च्या
यादीत समाविष्ट लोकांची दान केलेली गणना १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२०
पर्यंत केलेल्या ५ कोटी रुपयांहून जास्त रोकड किंवा रोकड सममूल्य दानाच्या
आधारावर केली आहे. लोककल्याणासाठी दान करणाऱ्या भारतीयांच्या यादीत एकूण
११२ लोकांचा समावेश केला आहे. २०१९ च्या तुलनेत यादीत दानशूरांची संख्या १२
टक्के वाढली आहे. या यादीत आदित्य बिर्ला ग्रुपचे चेअरमन कुमारमंगलम
बिर्ला यांना चौथा क्रमांक मिळाला आहे. पाचव्या क्रमांकावर वेदांता ग्रुपचे
चेअरमन अनिल अग्रवाल आहेत.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!