रश्मी ठाकरे आणि अन्वय नाईक यांच्यात आर्थिक व्यवहार! किरिट सोमय्या यांचा गौप्यस्फोट; मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप


स्थैर्य, मुंबई, दि.११: अर्णब गोस्वामी अटक प्रकरणात भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि वास्तू सजावटकार अन्वय नाईक यांच्यात आर्थिक व्यवहार झाले आहेत. रायगड जिल्ह्यातील रेवदंडा नजिकच्या किल्ला कोर्लई इथे रश्मी ठाकरे आणि मनिषा वायकर यांनी नाईक कुटुंबाकडून जमीन घेतली, असा दावा किरिट सोमय्या यांनी केला आहे. उद्धव ठाकरे यांनी हा व्यवहार का लपवला? मुख्यमंत्र्यांनी रेवदंडाजवळ जमीन का घेतली? असे अजून किती व्यवहार झाले आहेत? असा सवाल किरिट सोमय्या यांनी मुख्यमंत्र्यांना विचारला आहे. त्याचबरोबर ठाकरे आणि नाईक कुटुंबात झालेल्या व्यवहाराची चौकशी व्हायला हवी, अशी मागणीही सोमय्या यांनी केली आहे. 

अन्वय मधुकर नाईक, अक्षदा अन्वय नाईक, आज्ञा अन्वय नाईक, रश्मी उद्धव ठाकरे, मनिषा रवींद्र वायकर यांच्याबरोबर किल्ला कोर्लई येथील आजूबाजूची जमीन रश्मी ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी विकत घेतली. तेथून दोन किमीवर असलेलं देवदंडा ही माझी सासूरवाडी आहे. म्हणून या जागेचं महत्त्व माल कळतंय. 21 मार्च 2014 रोजी 2 कोटी 20 लाख रुपये ठाकरे परिवाराने नाईक परिवाराला दिले. अशाप्रकारचे किती व्यवहार झाले ते उद्धव ठाकरे सांगतील का? देवदंड माझी सासूरवाडी आहे. पण उद्धव ठाकरे यांनी तिथली जमीन विकत घेण्याचं कारण काय? किती जमिनी घेतल्या? एक गोष्ट मला समजत नाही, सातबा-यावर संयुक्त नाव आहे. एका बाजूला अन्वय मधुकर नाईक, अक्षता नाईक, आज्ञा नाईक यांची नावे आहेत. पण काही लोकं जमिनी घेतात. स्वत:ला राहण्यासाठी घर, जमीन विकत घेतात. पण रश्मी उद्धव ठाकरे, मनिषा वायकर हे दोघं का आणि कसे एकत्रित आले? ठाकरे, नाईक जमीन व्यव्हाराची चौकशी व्हायला हवी. ठाकरे आणि वायकर परिवाराचे संयुक्त किती व्यव्हार झाले आहेत? याची चौकशी व्हावी. अन्वय नाईक प्रकरण एवढं गाजत आहे, या प्रकरणात एवढी तत्परता करण्यामागील कारण समोर यायला हवी, अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!