
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
स्थैर्य, दि.११: आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांच्या कारला सोमवारी कर्नाटकातील अंकोला येथे अपघात झाला. प्राथमिक माहितीनुसार, या दुर्घटनेत श्रीपाद नाईक यांच्या पत्नीचा मृत्यू झाला तर नाईक गंभीर जखमी आहेत. चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याचे समजते.
कर्नाटकातील अंकोला तालुक्यातील होसाकंबी गावातून प्रवास करता श्रीपाद नाईक यांच्या गाडीला अपघात झाला. चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी पलटल्याचे सांगितले जात आहे. ते यालपुराहून गोकर्ण येथे प्रवास करीत होते. त्यांच्या पत्नीला या अपघातात गंभीर दुखापत झाली व रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला. श्रीपाद नाईक यांच्याशिवाय इतर तिघांना किरकोळ जखमी झाले आहेत. मात्र दुर्देवाने यामध्ये श्रीपाद नाईक यांच्या पत्नी आणि पीएचा मृत्यू झाला.
