अयोध्येचे श्रीराम संदिर जगाची सांस्कृतिक राजधानी बनेल : मिलिंद परांडे 

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सातारा, दि. १५ : श्रीरामजन्सभूसमि तीर्थक्षेत्र न्यासाच्यावतीने अयोध्या येथील होणार असलेल्या राम मंदिराचे कार्य आता गतीमान झाले आहे. मंदिर निर्माणासाठी सर्व समाजातून निधी संकलन अभियान सुरु होणार आहे. हे श्रीराम मंदिर जगातील संस्कृतिक राजधानी बनेल असा विश्वास  विश्व हिंदू परिषदेचे अखिल भारतीय महामंत्री  मिलिंद परांडे यांनी सातारा येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
ते म्हणाले सुमारे पाच शतके चाललेला रामभक्तांचा संघर्ष यशस्वी होऊन दि.९ नोव्हेंबर २०१९ रोजी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने सत्याचा पूर्णपणे स्वीकार करत मंदिराचे कार्य पुढे घेऊन जाण्यासाठी न्यायालयाच्या निर्णयानुसार भारताच्या केंद्र शासनाने श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाची स्थापना केली. न्यासाच्या विनंतीवरून पंतप्रधानांनी ५ ऑगस्ट २०२० रोजी श्री रामजन्मभूमीच्या जागी भूमिपूजन व शिलापूजन करून कार्याचा श्रीगणेशा केला. संपूर्ण देश व जगातील सर्व रामभक्तांचे नेत्र त्या दिव्य दृश्याकडे लागले होते. प्रस्तावित निर्माणाधीन मंदिर तीन मजल्यांचे असेल.प्रत्येक मजल्याची उंची २० फूटांची असेल.मंदिराची एकूण उंची १६१ फूट असेल, लांबी ३६० फूट आणि रूंदी २३५ फूट असेल. त्यावर पाच शिखर असतील .हे मंदिर २.७ एकर जागेवर होईल.त्याचे संपूर्ण बांधकाम केवळ दगडांनी असेल. सिमेंट व लोखंडाचा वापर यात होणार नाही .मंदिर परकोटाच्या बाहेर यजञशाळा, सत्संग भदन, संग्रहालय, संशोधन केंद्र, प्रदर्शन, अतिथी भवन इत्यादी सर्व अत्याधुनिक सोई-सुविधा होतील. एकूण तीन ते साडे तीन वर्षांच्या अवधीत हेकार्य पूर्ण होईल. मंदिराच्या बांधकामाच्या अनुषंगानेच श्रीअयोध्याजीचे विकास कार्यसुद्धा सुरू झाले आहे.बांधकामानंतर आधी संपूर्ण भारत देश, नंतर जवळपासचे आशियाई देश व त्यानंतर संपूर्ण जगातील रामभक्तांचा संपर्क, समन्वय, सहयोग आणि समरसतेच्या केंद्राच्या रुपात ती पुढे येऊन जगाच्या सांस्कृतिक राजधानीचे स्वरूप तिला येईल, असा प्रयत्न आहे. या कार्यासाठी रामभक्‍तांचा सहभाग निश्‍चित करण्यासाठी रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाच्या विनंतीवरून मकर  संक्रांतीपासून माघ पोर्णिमेपर्यत म्हणजे दि .१५ जानेवारी ते २७ फेब्रुवारी २०२१ पर्यंत निधी समर्पण आभियानाचा संपूर्ण देशभर होत आहे. या माध्यमातून देशातील चार लाख गाव तसेच ११ कोटी कुटुंबांपर्यंत पोचण्याचे नियोजन केले आहे. आर्थिक पारदर्शिता रहावी म्हणून रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाच्यावतीने पावती पुस्तके व १ हजार, १०० रुपये, १० रुपयांच्या कूपन्सची रचना करून त्यामाध्यमातून अधिकाधिकत लोकांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न करणार आहे. महाराष्ट्र राज्यात हे अभियान दि.१५ जानेवारी ते ३१ या कालावधीत होणार आहे. क अभियानच्या माध्यमातून ४५ हजार गावातील व शहरी भागातील वस्तीतून २.५ कोटी कुटुं पोहचण्याचे उद्दिष्ट निश्‍चित करण्यात आले आहे. याकरिता २.५ लाख रामभक्त कार्यकर्ते सक्रीय झाले आहेत.

Back to top button
Don`t copy text!