पालखी मार्गात आरोग्य दूतांमार्फत होणार आरोग्य विषयी जनजागृती

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य । दि. २९ जून २०२२ । सातारा । आरोग्य विभाग जिल्हा परिषद सातारा यांच्या मार्फत सुरू करण्यात आलेल्या आरोग्य दूत या नवीन संकल्पनेस पालकमंत्री  बाळासाहेब पाटील यांनी हिरवा झेंडा दाखवून मार्गस्त केले.

पाडेगाव येथे झालेल्या या कार्यक्रमास  खासदार श्री श्रीनिवास पाटील साहेब  आमदार मकरंद पाटील, आमदार दिपक चव्हाण,  जिल्हाधिकारी  शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी  विनय गौडा,जिल्हा आरोग्य अधिकारी  डॉ. राधाकिशन पवार, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन पाटील, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी  डॉ. प्रमोद शिर्के, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश पाटील  तसेच सर्व जिल्हा शासकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते

प्रारंभी खासदार श्री. पाटील यांनी शाल व श्रीफळ देऊन आरोग्य दूतांचा सन्मान केला. पालखी मार्गात हे आरोग्य दूत आरोग्य विषयी घ्यावयाची काळजी व आरोग्य सुविधा देणार आहेत.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!