
स्थैर्य, सातारा, दि.१: भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी येथील अन्यायी समाज व्यवस्थेविरोधात मूकनायक हे वर्तमानपत्र काढून त्या व्यवस्थेच्या विरोधात ज्योत पेटवली ती सध्याच्या दबावतंत्राचा विरोधात अधिक प्रखर करण्याची सध्या गरज असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र विधान सभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी मुंबई येथे बोलताना व्यक्त केले .
मुंबई मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात वर्ल्ड बुद्धिस्ट आणि आंबेडकराईट मिशन भारत आणि कल्याण तालुका जर्नालिस्ट वेल्फेअर असोसिएशन च्या वतीने मूकनायक शताब्दी सांगता सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. विचारमंचावर महाराष्ट्र विधान सभेचे अध्यक्ष नाना पटोले;महापौर किशोरीताई पेडणेकर; बंगळुरू च्या नमो होमियोपॅथी चे संचालक डॉ रामप्रसाद मोरे , मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे , कल्याण तालुका जर्नालिस्ट वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप जगताप , साहेबराव सुरवाडे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मुकनायक सामाजिक पत्रकारिता पुरस्काराचे वितरण महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते व केंद्रिय मंत्री ना.रामदास आठवले आणि
महापौर किशोरीताई पेडणेकर यांच्या हस्ते करण्यात आले..
यावेळी सातारा येथील ज्येष्ठ पत्रकार विजय मांडके , दिवाकर शेजवळ, किरण सोनवणे , वीनू वर्गिस यांना मुकनायक सामाजिक पत्रकारिता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
वृत्तपत्र सामान्याचे व्हावे समाजव्यवस्थेचे दुखणे वृत्तपत्रांनी मांडावे ही खरी गरज आहे मला बांधली आहे पत्रकारांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे अशा परिस्थितीत काम करणाऱ्यांवर मोठी जबाबदारी असते त्यांच्या कामाचे कौतुक करणे त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप ही काळाची गरज आहे असे नाना पटोले म्हणाले
दलित आणि सवर्ण दोन्ही समाजात एकजूट निर्माण करून समजतील जातीभेद नष्ट करणे हे महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे मिशन आहे. संविधानाने अस्पृश्यता जातीभेद दूर केले असले तरी काही लोकांच्या मनात अजूनही जातीभेद आहेत. जातीभेद नष्ट करून सामाजिक समता निर्माण करणे हे आंबेडकरी चळवळीचे उद्दिष्ट्य आहे असे मत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री ना रामदास आठवले यांनी व्यक्त केले.
यावेळी मुंबईच्या महापौर किशोरीताई पेडणेकर , मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे संयोजक प्रदीप जगताप यांनी हा कार्यक्रम आयोजित करण्या मागील हेतू विशद केला.
यावेळी रवींद्र तायडे. चंद्रशेखर कांबळे; सोना कांबळे; राजेंद्र जाधव; मनीषा सुर्वे , कांचनताई जगताप , आदी मान्यवर उपस्थित होते.