अजिंक्यतारा कारखान्याच्या शिरपेचात आणखी एक मनाचा तुरा आ. शिवेंद्रसिंहराजे; सभासद, शेतकरी, कामगारांचे मानले आभार

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

स्थैर्य, सातारा, दि.१: राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ नवी दिल्ली यांच्यावतीने २०१९-२० या वर्षासाठीचा उत्कृष्ट ऊस उत्पादकतेचा द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार अजिक्यतारा सहकारी साखर कारखान्याला जाहीर झाला आहे. या पुरस्कारामुळे अजिंक्यतारा कारखान्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे, अशी प्रतिक्रिया कारखान्याचे मार्गदर्शक संचालक आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली.

दरम्यान, अजिंक्यतारा कारखान्याने सभासद शेतकऱ्यांचे हित जोपासतानाच सहकार क्षेत्रातील आपली आदर्श वाटचाल जोमाने सुरु ठेवली आहे. कारखान्याच्या यशस्वी वाटचालीत नेहमीच मोलाचे योगदान देणाऱ्या सर्व सभासद, शेतकरी, कामगार कर्मचाऱ्यांचे आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी या निमित्ताने आभार मानले आहेत.

ऊस पुरवठादार शेतकऱ्यांना एफआरपी नुसार वेळच्या वेळी संपूर्ण पेमेंट अदा करणारा कारखाना अशी ख्याती मिळवलेल्या अजिंक्यतारा कारखान्याने राज्यात नावलौकिक मिळवला आहे. कारखान्याला राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ नवी दिल्ली यांच्यावतीने २०१९-२० या वर्षासाठीचा उत्कृष्ट ऊस उत्पादकतेचा द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला असून ही सर्वांसाठीच गौरवाची आणि अभिमानाची बाब आहे. मिळालेल्या पुरस्कारामुळे संस्था अधिक सक्षमपणे आणि जबाबदारीने चालवण्याची प्रेरणा संचालक मंडळाला मिळणार असून आगामी काळात अजिंक्यतारा कारखाना राज्यातीलच नव्हे तर देशातील आदर्श कारखाना होईल असा विश्वास व्यक्त करून आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी संचालक मंडळाच्यावतीने सभासद शेतकऱ्यांचे आभार मानले आहेत.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!