श्रायबर डायनॅमिक्स च्या प्रवीण पाटील यांना पुरस्कार


दैनिक स्थैर्य । दि. २५ नोव्हेंबर २०२२ । बारामती । श्रायबर डायनॅमिक्स डेअरी प्रा ली कंपनीचे व्हेटरनरी डिपार्टमेंटचे प्रमुख प्रवीण पाटील यांना भारत रत्न डॉ राधा कृष्ण मेडल अवॉर्ड ने सन्मानित करण्यात आले आहे. ग्लोबल इकॉनॉमिक प्रोग्रेस अँड रिसर्च असोसिएशन न्यू दिल्ली यांच्या वतीने बेंगलोर येथे 30 ऑक्टोम्बर रोजी आयोजित कार्यक्रमात सदर पुरस्कार देण्यात आला या प्रसंगी बंगलोर कृषी विद्यापीठाचे उपकुलगुरू एच शिवांना, भारत संचार निगम चे सल्लागार लक्ष्मी नारायण स्वामी आदी मान्यवर उपस्तित होते. प्रवीण पाटील यांनी मागील 19 वर्षा मध्ये शेतकऱ्यांच्या दुधा उत्पादन मध्ये वाढ होणे, स्वच्छ व निर्भळ दूध मिळावे व त्यापासून ग्राहकांना उच्च प्रतीचे उत्पादन मिळावे या साठी शेतकरी व कंपनी प्रशासन बरोबर काम केले आहे विशेतः शेतकऱ्याचे पशुधन व दूध या साठी तांत्रिक माहिती, मेळावे, कार्यशाळा, चर्चा सत्र आदी चे आयोजन केले आहे त्यांच्या कार्याची दखल घेऊन सदर पुरस्कार देण्यात आला आहे.

श्रायबर डायनॅमिक्स डेअरी चे वरिष्ठ संचालक जितेंद्र जाधव, कर्मचारी संघटना अध्यक्ष नानासो थोरात यांचे मार्गदर्शन व दूध उत्पादक यांनी केलेले सहकार्य व दूध क्षेत्रातील ज्ञान या मुळे पुरस्कारास पात्र झाल्याचे प्रवीण पाटील यांनी सांगितले.


Back to top button
Don`t copy text!