दैनिक स्थैर्य । दि. ०५ मे २०२३ । सातारा । रयत शिक्षण संस्थेच्या सातारा येथील छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये इंग्रजी विभागामार्फत एव्हिएशन, हॉस्पिटॅलिटी अँड टूरिझम हा कोर्स सुरु करण्यात आला आहे. सदर कोर्सचा कालावधी हा तीन महिन्यांचा असून यामध्ये हवाईसुंदरी (Airhostess) तसेच विमानतळावरील इतर नोकरीच्या संधींबद्दल मार्गदर्शन व प्रशिक्षण देण्यात येत आहे. कोणत्याही शाखेतील १२ वीचे विद्यार्थी-विद्यार्थिनी सदर कोर्सला प्रवेश घेऊ शकतात. विमानतळांवर उपलब्ध असलेल्या विविध नोकऱ्यांसंदर्भात हे प्रशिक्षण आहे. या प्रशिक्षणाचा लाभ जास्तीत जास्त विद्यार्थांनी घ्यावा असे आवाहन कॉलेजचे प्राचार्य डॉ. विठ्ठल शिवणकर व इंग्रजी विभाग प्रमुख प्रो. डॉ. रोशनआरा शेख यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी विद्यार्थांनी पुढील नंबरवर संपर्क करावा- ९२७०६१९०२५, ९३२४७९८११८, ९८५००४०११४.