पाणी जपून वापरणे गरजेचे : खासदार रणजितसिंह

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. १५ सप्टेंबर २०२३ | फलटण | सध्या फलटण तालुक्यामध्ये पाण्याची व चाऱ्याचे जी उपलब्धता आहे; त्यानुसार पाणी जपून वापरणे गरजेचे असून प्रत्येक नागरिकांनी स्वतःपासून पाण्याचे व चाऱ्याचे नियोजन करावे; असे आवाहन खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केले.

फलटण येथील दरबार हॉलमध्ये आयोजित टंचाई आढावा बैठकीमध्ये खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर बोलत होते. यावेळी सहाय्यक कामगार आयुक्त रेवननाथ भिसले, प्रांताधिकारी सचिन ढोले, तहसीलदार डॉ. अभिजित जाधव, मुख्याधिकारी संजय गायकवाड, गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे, निवृत्त सनदी अधिकारी विश्वासराव भोसले, स्वराज पतसंस्थेचे चेअरमन अभिजित नाईक निंबाळकर, भाजपा तालुकाध्यक्ष बजरंग गावडे, माजी उपनगराध्यक्ष राजेश शिंदे, माजी नगरसेवक अशोकराव जाधव यांच्यासह तालुक्यातील सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, मंडल अधिकारी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना खासदार रणजितसिंह म्हणाले की, फलटण तालुक्यामध्ये सध्या पाण्याचे जे नियोजन करण्यात आलेले आहे. त्यामध्ये सुधारणा करून फलटण तालुक्यामधील सर्वसामान्य शेतकऱ्याला व नागरिकाला पिण्यासाठी व शेतीसाठी कशाप्रकारे पाणी उपलब्ध करून देता येईल; याबाबत सविस्तर अहवाल तयार करावा रामीं भागामधील ज्या गावाला पाणी देऊ शकत नाही अशा ठिकाणी टँकर्स तातडीने सुरू करण्यात यावेत.

सध्या तालुक्यामधील विविध गावांमध्ये धोम – बलकवडीचे पाणी पोहोचल्यामध्ये अडचणी येत आहे. यासाठी पाटबंधारे विभागाने संपूर्ण माहिती घेऊन याबाबतचा सविस्तर अहवाल नियमितपणे प्रांताधिकारी सचिन ढोले यांच्याकडे व लोकप्रतिनिधींसाठी अथवा जनतेसाठी म्हणून उपलब्ध करून ठेवावा. यासोबतच सद्यस्थितीत असलेला पाणीसाठा व पाण्याचे नियोजनाला पत्रकारांच्या माध्यमातून व्यापक प्रसिद्धी देण्यात यावी; असेही निर्देश यावेळी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिले.

यावेळी फलटण तालुक्यामध्ये असलेली सद्यस्थितीमधील पाण्याची व चाऱ्याच्या व्यवस्थेबाबत माहिती फलटणचे प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिली. फलटण तालुक्यामध्ये कृषी विभागाच्या माध्यमातून टंचाई निवारणासाठी कोणकोणत्या उपाययोजना करण्यात येत आहेत याबाबतची माहिती तालुका कृषी अधिकारी सागर डांगे यांनी दिली. टंचाई निवारणामध्ये महत्त्वाचा भूमिका असलेले नीरा उजवा कालवा, नीरा देवधर प्रकल्प व धोम – बलकवडी प्रकल्पाचे अधिकाऱ्यांनी पाण्याच्या नियोजनाबाबत सविस्तर माहिती दिली.


Back to top button
Don`t copy text!