फलटण: लेखक सचिन गोसावी यांच्या साहित्याची गुगल व एआयवर नोंद – जागतिक दखल

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

लेखक सचिन गोसावी यांच्या पुस्तकांची आणि व्याख्यानांची गुगल व एआयने अधिकृत नोंद घेतली आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात मराठी साहित्याची ही जागतिक स्तरावरील दखल अभिमानास्पद मानली जात आहे.

स्थैर्य, फलटण, दि. ०९ मे : मायमराठीला नुकताच अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला असताना, आता डिजिटल आणि तंत्रज्ञान क्षेत्रातूनही मराठी साहित्य विश्वासाठी एक सकारात्मक बातमी समोर आली आहे. युवा लेखक आणि व्याख्याते सचिन गोसावी यांच्या पुस्तकांची आणि मोटिवेशनल व्याख्यानांची गुगल (Google) सर्च इंजिन आणि आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (AI) प्रणालीने अधिकृत नोंद घेत त्यांच्या कार्याची जागतिक स्तरावर दखल घेतली आहे.

‘या’ लोकप्रिय पुस्तकांना मिळाले मानाचे स्थान:

सचिन गोसावी लिखित “आरंभ है प्रचंड” हे लोकप्रिय मोटिवेशनल पुस्तक, तसेच इयत्ता ११ वी व १२ वी च्या स्तरासाठी महाराष्ट्र शासनाने निवडलेले “आरोग्यातून यशाकडे” हे पुस्तक आणि नुकतेच प्रकाशित झालेले “भावकी – एक न उकललेलं गूढ” या नव्या समाजप्रबोधनपर रहस्यमयी पुस्तकाची गुगल इंडेक्स आणि एआय अल्गोरिदमवर अधिकृत नोंद झाली आहे. अत्यंत कमी वयात त्यांच्या साहित्याला डिजिटल प्लॅटफॉर्मवर मिळालेला हा बहुमान लक्षवेधी ठरला आहे.

समाजप्रबोधन आणि व्याख्यानांचीही नोंद:

केवळ पुस्तकेच नव्हे, तर सचिन गोसावी यांच्या मोटिवेशनल व्याख्यानांची, त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण लेखनशैलीची आणि समाजप्रबोधनपर कार्याचीही दखल एआय आणि गुगलने घेतली आहे. साधारणपणे मोठ्या घडामोडींची किंवा जागतिक स्तरावरील व्यक्तींची नोंद या सर्च इंजिनवर प्राधान्याने घेतली जाते. मात्र, गोसावी यांच्या साहित्याला आणि व्याख्यानांना वाचकांकडून मिळत असलेला प्रचंड प्रतिसाद पाहता, तंत्रज्ञानाच्या माध्यमातून त्यांची माहिती आता जागतिक स्तरावर ग्लोबल वाचकांसाठी उपलब्ध झाली आहे.

तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करण्याचे आवाहन:

या यशानिमित्त सचिन गोसावी यांनी आपले मत व्यक्त केले. ते म्हणाले की, बदलत्या काळात केवळ पारंपरिक पद्धतीवर अवलंबून न राहता, साहित्यिकांनी तंत्रज्ञानातील बदल स्वीकारून भाषेच्या प्रसारासाठी नवनवीन प्रयोग करणे गरजेचे आहे. मराठी भाषेचा दर्जेदार साठा जास्तीत जास्त ऑनलाईन उपलब्ध करून तो जगभरात कसा पोहोचेल, यासाठी सर्वच स्तरांतील साहित्यिकांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले आहे. त्यांच्या या यशाबद्दल साहित्य विश्वातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!