औरंगाबादचा विकास वेगाने होणार; मला विकास कामे करण्याची घाई : उद्धव ठाकरे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 

स्थैर्य, औरंगाबाद, दि.१२: मला ही विकास कामांची घाई झाली आहे. औरंगाबादचा विकास वेगाने करायचा
आहे. केवळ भूमिपूजन झालं. कुदळ मारली असं करायचं नाही. काम पूर्ण करायचं
आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. (Cm Uddhav Thackeray
addressing in Aurangabad programme)

औरंगाबाद निवडणुका आल्या म्हणून मी विकास कामे करायला आलो नाही.
कोविडमुळे ही कामे रखडली होती. आता थोडा प्रादुर्भाव कमी
झाला आहे. मला ही विकास कामांची घाई झाली आहे. औरंगाबादचा विकास वेगाने
करायचा आहे. केवळ भूमिपूजन झालं. कुदळ मारली असं करायचं नाही. काम पूर्ण
करायचं आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  यांनी सांगितलं. (Cm Uddhav Thackeray addressing in Aurangabad programme)

मुख्यमंत्री
उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज औरंगाबादमधील पाणी पुरवठा योजनेसह चार
महत्त्वाच्या कामांचा शुभारंभ करण्यात आला. त्यानंतर झालेल्या छोटेखानी
सभेद्वारे त्यांनी जनतेशी संवाद साधला. इतके दिवस मला या शहराने खूप काही
दिलं. आता मला काम करण्याची घाई लागली आहे. या शहराचा मला वेगाने विकास
करायचा आहे. केवळ भूमिपूजन झालं. कुदळ मारली म्हणजे झालं असं नाही. मी काम
पूर्ण करणारच आहे, असंही ते म्हणाले.

रिमोट कंट्रोलमुळे ज्यांची ओळख त्यांच्या नावाच्या उद्यानाचं रिमोटनेच उद्घघाटन

यावेळी
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते हिंदूहृदसम्राट बाळासाहेब ठाकरे स्मृती
उद्यानाचे उद्घाटन करण्यात आले. रिमोटद्वारे हे उद्घाटन करण्यात आले.
त्यावर त्यांनी मार्मिक भाष्य केलं. ज्यांच्या हातात सत्तेचं रिमोट कंट्रोल
होतं. ज्यांची ओळख रिमोट कंट्रोलमुळे होत होती. त्यांच्या नावाने असलेल्या
उद्यानाचे रिमोटद्वारे उद्घाटन करावं लागतंय, असं मुख्यमंत्री म्हणाले.

मला तुमचे आशीर्वाद हवेत

लोक
मला आमचे लाडके मुख्यमंत्री म्हणतात. पण मला लाड वगैरे नको आहे. मला केवळ
तुमचे आशीर्वाद हवे आहेत, असंही ते म्हणाले. कोरोना काळात मी घरात बसून काम
केली, असंही त्यांनी सांगितलं. तसेच पाणी पुरवठा योजना आता मार्गी लागली
आहे. आता शहरातील गुंठेवारीचा प्रश्नही सोडवण्यात येईल, असं आश्वासनही
त्यांनी दिलं.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!