दैनिक स्थैर्य | दि. २२ जून २०२४ | फलटण |
कृषी महाविद्यालय फलटण येथील कृषीदूतांनी “आंतरराष्ट्रीय योगा दिना”निमित्त जि. प. प्राथमिक शाळा, ललगुण येथे सहभाग दर्शविला.
ग्रामीण जागरुकता कार्यानुभव व औद्योगिक जोड प्रकल्प २०२४-२५ कार्यक्रमांतर्गत फलटण एज्युकेशन सोसायटीचे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी मान्यताप्राप्त कृषी महाविद्यालय फलटण येथील कृषीदूतांनी “आंतरराष्ट्रीय योगा दिन” निमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, ललगुण येथे जाऊन योगाभ्यासाचे महत्त्व सांगून विद्यार्थ्यांमध्ये जागरुकता निर्माण केली.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक अरुण आवळे सर, केशव वानखेडे सर, विश्वास चौधरी सर, सुनील मदने सर, कमलेश पाटील सर, संध्या गावित मॅडम, शुभांगी पवार मॅडम हे उपस्थित होते. तसेच विश्वास चौधरी सर यांनी विद्यार्थ्यांना योगाभ्यासाचे पाठ दिले व कार्यक्रमाच्या शेवटी कृषीदूतांकडून खाऊवाटप करण्यात आला. शाळेतील विद्यार्थ्यांचा कार्यक्रमास पूर्ण प्रतिसाद मिळाला.
कृषी महाविद्यालय फलटणचे प्राचार्य श्री. डॉ. यु. डी. चव्हाण सर, श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय फलटणचे प्राचार्य श्री. डॉ. एस. डी. निंबाळकर सर, समन्वयक प्रा. निलिमा धालपे मॅडम, कार्यक्रम अधिकारी प्रा. स्वप्निल लाळगे सर, प्रा. नितिशा पंडित मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली कृषीदूत उदयसिंह गायकवाड, बागुल सुमित, ओंकार खेडकर, गौरव रायकर, बोदडे अमितेश, आदित्य घेवारे यांनी योग दिन साजरा केला.