
दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
थेट WhatsApp वर मिळवा
दैनिक स्थैर्य । दि. 16 ऑक्टोबर 2021 । आसू । आसू (ता.फलटण) येथील फुलेवस्ती येथे रस्त्याची दुरावस्था पाहून रस्त्यावर स्वखर्चातून मुरमीकरण करण्यात आले. शासकीय योजनेवर अवलंबून न राहता फुले परिवारातील भाऊ भावांनी पैसे गोळा करून भावकी प्रेम म्हणून रस्त्याचे हे काम पूर्ण केले.
या कार्यामुळे आसू ग्रामस्थांमध्ये फुले परिवारातील एकीचे कौतुक केले जात आहे. प्रतिकभैय्या फुले, संदीप फुले, सचिन फुले, सुनील फुले, विनोद फुले, अजिंक्यभैय्या फुले, अजय फुले, जयदीप फुले, अक्षय फुले, किरण फुले, दीपक फुले, अमोल फुले ,नितीन फुले या सर्व बंधूनी एकत्र येत हे काम यशस्वीरित्या पर पाडले आणि गावा समोर एक आदर्श निर्माण केला आहे.
