
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
स्थैर्य, फलटण दि.२७ : विडणी (ता.फलटण) येथील श्री संत सावता माळी सामाजिक सांस्कृतिक गणेश मंडळातर्फे प्राथमिक आरोग्य उपकेंद्रास प्रिंटर, स्कॅनर, झेरॉक्स मशीन व व्हिटॅमिन सी व आइवर मेकटीनच्या गोळ्या अशी एकूण 30 हजार रुपयांची मदत डॉ.नयद शेंडे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली.
यावेळी विडणी गावच्या सरपंच सौ.रुपालीताई अभंग, ग्रामपंचायत सदस्य वैभव पवार, मंडळाचे अध्यक्ष डॉ.किरण शेंडे, उपाध्यक्ष वैजनाथ नाळे, सचिव हरीश बेडके, कार्यकर्ते गणेश कर्वे, महेश कदम, शुभम जाधव, सुदर्शन बेडके, ग्रामसेवक चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.
मंडळाच्या या उपक्रमाबद्दल विडणी ग्रामपंचायतीने सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना धन्यवाद दिले.
