
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य । दि. 08 डिसेंबर 2021 । फलटण । येथील क्रांतिसूर्य प्रतिष्ठानच्यावतीने गुणवंत विद्यार्थीनी कु.शिवांजली संतोष धुमाळ हिला उच्चशिक्षणासाठी प्रत्साहनपर निधी म्हणून 10 हजार रुपयांची मदत मदत करण्यात आली. प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सातारा जिल्हा ओ.बी.सी. सेलचे अध्यक्षमिलिंद नेवसे यांच्या हस्ते ही मदत सुपूर्द करण्यात आली.
क्रांतिसूर्य प्रतिष्ठान वेगवेगळ्या सामाजिक क्षेत्रात आपल्या कार्यासाठी प्रसिद्ध आहे. कु.शिवांजली धुमाळ ही मुधोजी हायस्कूलची माजी विद्यार्थिनी असून राजेंद्र विद्यालयात इयत्ता 12 वी विज्ञान मध्ये तिला 94 टक्के गुण मिळाले होते. याची दखल घेत प्रतिष्ठानने तिला पुढील उच्च शिक्षणासाठी मदत केली आहे.
यावेळी धुमाळ परिवार व प्रतिष्ठानचे कार्यकर्ते उपस्थित होते.
