दैनिक स्थैर्य | दि. १२ जून २०२४ | फलटण |
सातारा ते फलटण रस्त्याचे सुरू असलेले डांबरीकरणाचे काम पावसाळ्यात सार्वजनिक बांधकाम विभागाने बंद ठेवावे, अशा मागणीचे निवेदन सनी काकडे व कार्यकर्त्यांनी फलटण येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपअभियंत्यांना दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, नुकताच पावसाळा सुरू झाला असून पावसाळ्यात रस्त्याचे डांबरीकरण दर्जेदार होत नाही. सध्या राज्य सरकार व केंद्र सरकार यांच्यामार्फत वेगवेगळ्या योजनांतून अनेक डांबरी रस्त्यांचे काम सुरू आहे; परंतु पावसाळ्यात पाहिजे अशी मजबुती या कामाला येऊ शकत नाही. त्यामुळे फलटण ते सातारा होत असलेला डांबरी रोड आणि फलटण कार्यालयाच्या अधीन येणार्या रस्त्यांच्याडांबरीकरणाचे काम बंद करण्याचे ठेकेदारांना आदेश करावेत आणि काम बंदच्या आदेशाची प्रत माहितीसाठी कामगार संघर्ष संघटना व आझाद समाज पार्टीला द्यावी, अशी मागणी फलटण सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सनी काकडे, आप्पा गायकवाड, अमर झेंडे, सूरज भाऊलुमे, सिद्धार्थ अहिवळे, जय माने, रोहित अहिवळे व सूरज अहिवळे यांनी केली आहे.