
स्थैर्य, फलटण, दि. २६: केंद्रीय बांधकाम व रस्ते वाहतूक मंञी ना. नितीन गडकरी यांनी राष्ट्रीय महागार्गाचे रोज ४० कि. मी. काम पूर्ण होणे शक्य असल्याचे भाकित केले होते, त्याचाच प्रत्यय सोलापुर ते विजापुर या राष्ट्रीय माहामार्गावर आला. मूळचे निंबळक ता. फलटण येथील राम निंबाळकर यांच्या राज ग्रुपने सोलापूर ते विजापूर या राट्रीय महामार्गावर एका दिवसात म्हणजेच २४ तासात २५ किलोमीटर डांबरीकरणाचे काम पूर्ण करुन विक्रमी नोंद राम निंबाळकर यांच्या राज ग्रुपच्या नावावर झालेली आहे.
निंबळक, ता. फलटणचे सुपुञ, देशातील प्रसिध्द बांधकाम व्यावसायिक, राज ग्रुपचे सर्वेसर्वा राम निंबाळकर यांनी या मध्ये सहभाग घेऊन एका दिवसात म्हणजेच २४ तासात २५ किलोमीटरचे डांबरीकरणाचे काम पूर्ण केलेले आहे. या अगोदर २४ तासात १० किलोमीटर काम झाल्याची नोंद असल्याचे प्रकल्प अधिकारी स्पष्ट करतात.
राम निंबाळकर यांच्या राज ग्रुप कंपनीने राज्यासह परराज्यात अनेक ठिकाणी मोठे प्रकल्प यशस्वीरीत्या पूर्ण केलेले आहेत. अनेक मोठे प्रकल्प सुरु असल्याचे राज ग्रुपच्या वतीने स्पष्ट करण्यात आलेले आहे.