दैनिक स्थैर्य | दि. १४ एप्रिल २०२३ | फलटण |
बँक ऑफ इंडियाचे निवृत्त प्रबंधक व राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे राज्य कार्यकारिणी सदस्य अशोकराव कांबळे व मुधोजी कॉलेजचे प्रा. डॉ. प्रभाकर पवार यांना कोल्हापूर येथील निर्मिती विचारमंच आणि संविधान जनजागृती अभियानातर्फे राष्ट्रीय संविधान सन्मान पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
कोल्हापूर येथील शाहू स्मारक भवनात हा कार्यक्रम झाला. माजी आमदार राजीव आवळे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
अशोक कांबळे व प्रा. पवार यांना सामाजिक कार्याबद्दल हा पुरस्कार देण्यात आला आहे. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अशोकराव कांबळे व प्रा. डॉ. प्रभाकर पवार यांचे अभिनंदन केले आहे.