अशोक सिंघल यांचे भाऊ अरविंद सिंघल यांनी राम मंदिरासाठी दिले 11 कोटी रुपये

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य,उदयपूर,दि.१९: अयोध्येत उभारण्यात येणाऱ्या भगवान श्री रामांच्या भव्य मंदिरासाठी निधी संकलन सुरू आहे. देशभरातून अनेकजण या मंदिर निर्माणासाठी दान देत आहेत. दरम्यान, सर्वात मोठे दान उदयपूरच्या अरविंद सिंघल यांनी दिले आहे. विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष दिवंगत अशोक सिंघल यांचे लहान भाऊ अरविंद सिंघल यांनी मंदिर निर्माणासाठी 11 कोटी रुपये दिेले आहेत. यावेळी ते म्हणाले की, मोठ्या भावाचे राम मंदिराचे स्वप्न पूर्ण होत आहे. याचा मला अत्यंत आनंद आहे.

अरविंद सिंघल यांनी राम मंदिराच्या उभारणीसाठी उदयपूरमध्ये दान जमा करीत असलेले पारस सिंघवी यांच्याकडे दोन वेळा चेकच्या माध्यमातून 11 कोटी रुपयांचा निधी दिला. पहिल्या टप्प्यात त्यांनी 5 कोटी आणि नंतर 6 कोटी रुपयांचा चेक दिला. अरविंद सिंघल वॉलकॅन इंडिया प्रायवेट लिमिटेडचे मॅनेजिंग डायरेक्टर आहेत. वॉलकॅन इंडिया प्रायवेट लिमिटेड मायनिंग क्षेत्रासोबतच विजेचे मीटर आणि उपकरण बनवणारी कंपनी आहे.

मंदिराच्या भूमी पूजनादरम्यान उपस्थित होते सिंघल

अयोध्येतील राम मंदिराच्या भूमी पूजनाच्या कार्यक्रमात देशातील निवडत लोकांना आमंत्रण दिले होते. यात अरविंद सिंघल यांनाही बोलवण्यात आले होते, पण आजारी असल्यामुळे ते गेले नव्हते. त्यांच्या जागी त्यांचे पुतणे सलिल सिंघल आणि त्यांची पत्नी गेले होते. विश्व हिंदू परिषदेने केलेल्या राम मंदिर आंदोलनात अशोक सिंघल यांची मोठी भूमिका होती. त्यांनी राम मंदिर उभारणीसाठी अनेक आंदोलनाचे नेतृत्व केले होते.


Back to top button
Don`t copy text!