रयत शिक्षण संस्थेच्या कार्याध्यक्षपदी डॉ. अनिल पाटील यांची पुन्हा बिनविरोध निवड

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सातारा, दि. २० : संस्थेचे अध्यक्ष खासदार शरदरावजी पवार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलच्या बैठकीत सन २०२०-२१ ते २०२२-२३ या कालावधीसाठी विविध पदांच्या निवडी झाल्या असून संस्थेचे कार्याध्यक्ष म्हणून डॉ. अनिल पाटील यांची एकमताने निवड झाली तर संस्थेचे व्हा. चेअरमन म्हणून  ॲड. भगीरथ शिंदे यांची निवड झाली. संस्थेच्या उच्च शिक्षण विभागाच्या सहसचिव म्हणून धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. प्रतिभा गायकवाड, माध्यमिक विभागाचे सहसचिव म्हणून आण्णासाहेब कल्याणी विद्यालायाचे मुख्याध्यापक संजय नागपुरे, संस्थेचे ऑडिटर म्हणून सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालाचे प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे यांची एकमताने निवड करण्यात आली.

संस्थेच्या जनरल बॉडीचे सदस्य म्हणून आ. रोहित राजेंद्र पवार, अरुण गणपती लाड, मिलिंद हरिभाऊ माने, राहुल सुभाष इंग्रोळे, सुभाषलाल शंकरलाल गांधी, अरविंद रामभाऊ तुपे, विनय गोपीकिसन पाटील, ॲड. के.एस. खामकर, श्रीमती विजयमाला पतंगराव कदम, सदाशिवराव पाटील, अमोल हणमंतराव पाटील, ना. बाळासाहेब पाटील, आमदार मकरंद पाटील, डॉ. प्रदीप गोविंदराव शिंदे, सौ. निलीमा सुनील पोळ यांची एकमताने निवड करण्यात आली.

याशिवाय संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे निमंत्रित सदस्य म्हणून जयसिंगराव आनंदराव उर्फ राजेंद्र फाळके, आबासाहेब देशमुख, चंद्रकांत दळवी, ॲड. दिलावर मुल्ला, बाळासाहेब बोठे यांची एकमताने निवड करण्यात आली. तसेच संस्थेच्या पाच विभागाचे  विभागीय सल्लागार मंडळाचे चेअरमन म्हणून संजीव पाटील (मध्य विभाग), माधवराव मोहिते (दक्षिण विभाग), आ. आशुतोष काळे (उत्तर विभाग),  ॲड. राम कांडगे (पश्चिम विभाग), आ. बाळाराम पाटील (रायगड विभाग) यांची एकमताने निवड करण्यात आलेली आहे.

निवड झालेल्या सर्व मान्यवरांचे संस्थेचे अध्यक्ष खासदार शरदरावजी पवार यांनी अभिनंदन केले व त्याच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या या बैठकीस मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार, ना. दिलीप वळसे-पाटील, ना. डॉ. विश्वजित कदम, रामशेठ ठाकूर व इतर मान्यवर सदस्य उपस्थित होते.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!