श्रीनिवास पाटील म्हातारे झाल्याने पुढील खासदार नितीन काका व्हावेत – भिलार येथील कार्यक्रमात वसंतराव मानकुमरे यांचे खळबळजनक वक्तव्य

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य । दि. १६ डिसेंबर २०२१ । सातारा । लक्ष्मण तात्यांच्या पुण्याईमुळेच नितीन पाटील यांना जिल्हा बँकेचे अध्यक्षपद मिळाले. नितीन काका आता श्रीनिवास पाटील म्हातारे झाले आहेत. पुढील खासदार तुम्हीच व्हायला हवे, असे वक्तव्य जिल्हा परिषद सदस्य वसंतराव मानकुमरे यांनी केले. त्यांच्या या वक्तव्याने राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेकांना धक्का बसला.

दरवर्षी कळंबे महाराजांच्या समाधी स्थळावर अध्यात्मिक दृष्ट्या सजग कार्यक्रम होतो. मात्र, जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील यशामुळे वसंतराव मानकुमरे यांचा आत्मविश्वास दुणावला. कोरोनाच्या संकटामुळे दोन वर्ष कार्यक्रमात खंड पडला होता. त्या मुळे वसंतराव मानकुमरे यांनी मोठ्याप्रमाणात कार्यक्रम करण्याचा घाट घातला. या वेळी त्यांनी भाषणात अनेक धक्कादायक वक्तव्य करून आगामी निवडणुकांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत संघर्षाची चुणूक दाखवली

या वेळी मानकुमरे म्हणाले, आमदार मकरंद आबा पाटील यांनी महाबळेश्वर तालुक्यातील जागा बिनविरोध निवडून आणल्या. लक्ष्मण तात्या यांची पुण्याई त्यामुळे नितीन काकांना अध्यक्षपद मिळाले. काका आता श्रीनिवास पाटील म्हातारे झाले आहेत. पुढील खासदार तुम्हीच व्हायला हवे. निमित्त पुण्यस्मरण सोहळ्याचे होते परंतु या ठिकाणीं राजकीय आखाडाच रंगला. त्या मुळे अनेकांना गुदगुल्या झाल्या. मात्र, दुसरीकडे वारकरी संप्रदायातील लोकांनी याबाबत नाराजी व्यक्त केली.

Back to top button
Don`t copy text!