‘एनईपी २०२०’नुसार शिफारसीत नवीन कृषी अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना दिशादर्शक – श्री. अरविंद निकम

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. २ ऑक्टोबर २०२४ | फलटण |
‘एनईपी २०२०’ नुसार नवीन कृषि अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना दिशादर्शक ठरेल, असे प्रतिपादन फलटण एज्युकेशन सोसायटीचे प्रशासन अधिकारी श्री. अरविंद निकम यांनी केले.

फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित व महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी मान्यताप्राप्त श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय व कृषि महाविद्यालय, फलटण येथे आयोजित प्रथम वर्ष प्रवेशित विद्यार्थ्यांचे एनईपी २०२० व सहाव्या अधिष्ठाता समिती शिफारशीनुसार नवीन कृषि अभ्यासक्रमाचा विद्यार्थ्यांना कृषि शिक्षणाचा परिचय होण्यासाठी दिक्षारंभ – विद्यार्थी प्रेरित कार्यक्रम २०२४ मध्ये प्रमुख पाहुणे म्हणून निकम बोलत होते. यावेळी त्यांनी फलटण एज्युकेशन सोसायटीची पार्श्वभूमी, फलटण संस्थानचा ऐतिहासिक वारसा, दोन्ही महाविद्यालय स्थापनेमागचा इतिहास या विषयावर उपस्थित विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमास वक्ते म्हणून माजी विद्यार्थी श्री. विशाल वायकर, सहायक पोलीस निरीक्षक, ग्रामीण पोलीस परिक्षेत्र, फलटण, श्री. दिलीप महानवर, शाखा प्रबंधक, बँक ऑफ इंडिया, श्री. गणेश नाझिरकर, व्यवस्थापकीय संचालक, फ्रुटवाला बागायतदार लि., श्री. सुर्यकांत गुजले, अधिक्षक, महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ, फलटण उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजन व दिपप्रज्वलन करून करण्यात आली. प्रास्ताविक श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय, फलटणचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर यांनी केले.

डॉ. निंबाळकर यांनी एनईपी २०२० नुसार व सहाव्या अधिष्ठाता समितीचा शिफरसीचा परिचय, नवीन अभ्यासक्रमाचा सविस्तर परिचय, अभ्यासक्रमातील एनईपी २०२० च्या तांत्रिक संकलप्ना उपस्थित विद्यार्थ्यांना सविस्तर समजून सांगितल्या. यानंतर व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांचा सत्कार दोन्ही महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी केले.

सहायक पोलीस निरीक्षक श्री. विशाल वायकर यांनी मनोगत व्यक्त करताना प्रथम वर्षातील प्रवेशित विद्यार्थ्यांचे स्वागत व अभिनंदन केले तसेच प्रशासनाबद्दल सविस्तर माहिती, स्पर्धा परीक्षा तयारी, विद्यार्थी जीवनातील व्यक्तिमत्व विकासाचे पैलू, कृषि पदवी नंतर भविष्यातील संधी या विविध विषयांवर उपस्थित विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले.

माजी विद्यार्थी श्री. दिलीप महानवर यांनी मनोगत व्यक्त करताना पदवी झाल्यानंतर बँकिंग क्षेत्रातील भविष्यातील संधी, बँकिंग व्यवसाय व्यवस्थापन, महाविद्यालयीन जीवनातील झडणघडण या विषयांवर उपस्थित विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले.

माजी विद्यार्थी श्री. गणेश नाझिरकर यांनी मनोगत व्यक्त करताना फळबाग उत्पादनातून शेतीची वाटचाल, शेतकरी व समाज हितकारक कृषि शिक्षण, कॉर्पोरेट क्षेत्रातील कृषीच्या संधी, सुधारित कृषि विस्तार तंत्रज्ञान या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

माजी विद्यार्थी श्री. सूर्यकांत गुजले यांनी मनोगत व्यक्त करताना प्रथम वर्षापासून कृषि क्षेत्रातील भविष्यातील संधी जोपासने, कृषि क्षेत्रातील कनिष्ठ वरिष्ठ संबंध या विषयावर उपस्थित विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले.

कृषि महाविद्यालय फलटणचे प्राचार्य डॉ. यू. डी. चव्हाण यांनी मनोगत व्यक्त करताना सामाजिक जागृतीद्वारे शिक्षण, सामाजिक मूल्ये व नीतिशास्त्र, संघटनकौशल्य, नेतृत्व व विद्यार्थी जीवनातील महत्व, योगाशिक्षण महत्त्व व व्यवस्थापन या विषयावर उपस्थित विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाला दोन्ही महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद, कर्मचारी, प्रथम वर्षातील प्रवेशित विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रम आयोजनासाठी दोन्ही महाविद्यालयातील शैक्षणिक विभागाने परिश्रम घेतले.

सूत्रसंचालन कुमारी तनिष्का दौंडकर व कुमारी तन्वी लोकरे यांनी केले. आभार प्रा. एस. पी. बनकर यांनी मानले.


Back to top button
Don`t copy text!