धुमाळवाडी येथे उद्यान कन्यांचे आगमन


दैनिक स्थैर्य । 13 जून 2025। फलटण । धुमाळवाडी, ता. फलटण येथे उद्यानविद्या महाविद्यालयातील उद्यानकन्यांचे आगमन झाले. ग्रामीण उद्यानविद्या कार्यानुभव कार्यक्रम आणि कृषी औदयोगिक जोड 2025-2026 अंतर्गत या उद्यानकन्या गावातील शेतकर्‍यांना मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी सरपंच सौ रुपाली जाधव, ग्रामसेविका सौ. मुळीक, सहाय्यक कृषी अधिकारी सचिन जाधव मुकेश भेंडारकर, प्रगतशील शेतकरी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी उद्यान कन्यांचा सत्कार करण्यात आला.

ग्रामीण उद्यानविद्या कार्यानुभव कार्यक्रमाअंतर्गत सुमारे 20 आठवडे येथे वास्तव्यास राहणार आहेत. या उद्यानकन्या शेतकर्‍यांना शेतीविषयक माहिती, नवीन तंत्रज्ञान याबाबत माहिती देऊन गावामध्ये शेतीविषयक विविध उपक्रम व कार्यक्रम राबिवणार आहेत. माती परिक्षण, फळबाग लागवड, एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन, बीज प्रक्रिया, आधुनिक शेती अवजारे यांचा वापर, शेतीचा आर्थिक फायदा, जनावरांचे लसीकरण आदींबाबत उपस्थित गावकरी व शेतकर्‍यांशी संवाद साधणार आहेत. उद्यानविद्या विषयक जनजागृती करण्यास उद्यानविद्या कार्यानुभव यांचा अभ्यास उद्यानकन्या करणार आहेत.

नेहा बनकर, पायल आढाव, दिव्या चव्हाण, सृष्टी तांदळे, दिशीता शिंदे, गौरी सोनवलकर या उद्यान कन्यांचा समावेश आहे.

उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.डी. निंबाळकर, कृषिविद्यालयाचे प्राचार्य यु. डी. चव्हाण, कार्यक्रम अधिकारी प्रा. ए. डी. पाटील, प्रा. डॉ. जे. व्ही. लेंभे प्रा. डॉ. ए. आर. पाटील यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.


Back to top button
Don`t copy text!