श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयाच्या कृषी दूतांचे अहिरे येथे आगमन

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य । 15 जून 2025 । फलटण । येथील श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय, फलटण येथील सातव्या सत्रातील उद्यानदूत प्रशिक्षणासाठी अहिरे ता. पारगांव खंडाळा जि.सातारा येथे दाखल झाले आहेत. यावेळी सरपंच, उपसरपंच, कृषि सहायक, तलाठी व ग्रामस्थांनी या उद्यानदुत विद्यार्थ्यांचे स्वागत केले.

ग्रामीण उद्यानविदया कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत सुमारे 22 आठवडे येथे वास्तव्यास राहणार आहेत. याठिकाणी विद्यार्थी शेतकर्‍यांना शेतिविषयक माहिती, नवीन तंत्रज्ञान याबाबत माहिती देऊन गावामध्ये शेतिविषयक विविध उपक्रम व कार्यक्रम राबविणार आहेत.

माती परीक्षण, फळबाग लागवड, एकात्मिक कीड रोग, बीज प्रक्रिया, आधुनिक शेती औजारांचे वापर, शेतीचा आर्थिक फायदा, जनावरांचे लसीकरण आदीबाबत उपस्थित गावकरी व शेतकर्‍यांशी संवाद साधणार असल्याचे या उद्यानदुतां नी सांगितले. उद्यानविद्या विषयक जनजागृती करण्यास उद्यानविदया कार्यानुभव यांचा अभ्यास उद्यानदुत करणार आहेत.

रोहन दंडे, प्रज्वल दारफळे, सुमित आल्हाट, श्रेयांश जैन, शिवम शेंडगे हे उद्यानदूत येथे दाखल झाले आहेत. त्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन सरपंच रवींद्र सोनवणे, कृषी सहायक खरात, ग्रामपंचायत सदस्य व सर्व ग्रामस्थ यांनी यावेळी दिले. उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.डी. निंबाळकर, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यु. डी. चव्हाण, कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.जे.व्ही. लेंभे, प्रा.ए.डी. पाटील यांचे मार्गदर्शन या विद्यार्थ्यांना लाभणार आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!