
थेट WhatsApp वर मिळवा
स्थैर्य, सातारा, दि.५ : शहरालगत असणाऱ्या माहुली परिसरातील एका अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी प्रणय चंद्रहार माने याला सातारा शहर पोलिसांनी अटक केली आहे.
याप्रकरणी स्वत: पीडित मुलीनेच सातारा शहर पोलीस ठाण्यात संशयिता विरोधात तक्रार दिली आहे. याप्रकरणी माने याच्यावर पोस्कोंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत सातारा शहर पोलीस ठाण्यातून देण्यात आलेली अधिक माहिती अशी की, पीडित मुलगी तेरा वर्ष नऊ महिन्याची असून ती आपल्या कुटुंबासमवेत राहते.
संशयित हा तिच्या घरातील लोकांना जिवे मारून टाकण्याची भिती दाखवून तसेच पीडितेचे फोटो व्हायरल करण्याची भिती दाखवून दि. 1 ऑक्टोंबर 2020 ते दि. 2 फेब्रुवारी 2021 या काळात तिच्यावर अत्याचार करत होता. संशयिताच्या या कृत्याला वैतागलेल्या पीडितेने अखेर सातारा शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी तिच्याकडून घटनाक्रम जाणून घेतल्यानंतर संशयितावर पोस्कोंतर्गत व अनुसुचित जाती जमाती कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. पुढील तपास सहाय्यक पोलीस अधीक्षल आंचल दलाल या करत आहेत.



