बबन गोखले यांच्या खून प्रकरणातील बोलवत्या धन्याला अटक करा

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

स्थैर्य, सातारा दि.26 : बबन गोखले खून प्रकरणात आणखी तिसरा आरोपी असून त्याला तात्काळ अटक करावी तसेच या खुनापाठीमागे बोलवता धनी वेगळाच असून पोलीसांनी मुख्य सूत्रधारापर्यंत पोहचावे, अशी मागणी मृत बबन गोखले यांच्या पत्नी अलका गोखले यांनी पत्रकार परिषदेत केली.

यावेळी जनता क्रांती दलाच्या सातारा जिल्हा महिला अध्यक्ष पूजा भातकर, भटक्या जमाती संघटनेचे सरचिटणीस प्रा.एच.एम.नलावडे उपस्थित होते.

अलका गोखले म्हणाल्या, माझे पती बबन हनुमंत गोखले यांचा शुभम कदम आणि सचिन माळवे (रा.मंगळवार पेठ, सातारा) या दोघांनी पूर्वनियोजित कट रचून हा खून केला आहे. यामध्ये तिसरा आरोपी असून त्याला अद्याप पोलिसांनी तात्काळ अटक करावी. या हत्येमागे बोलविता धनी दुसराच कोणीतरी असून पोलीसांनी त्याची पाळेमुळे शोधून काढावीत. आरोपी हे गुन्हेगारी प्रवृत्तीचे असून त्यातील माळवे हा मुंबईहून सातार्‍यात आला आहे. त्याला बोगदा परिसरातील त्याच्या नातेवाईकांचा अभय असून त्यांचीही चौकशी करावी, अशीही मागणी यावेळी गोखले यांनी केली.

प्रा.एच.एम.नलावडे म्हणाले, हा खून अंडी देण्याच्या कारणावरुन केलेला नसून हे एक ठरवून केलेले कृत्य आहे. तरी त्यामागील खणे कारण व खरा सूत्रधार शोधण्यास पोलीसांनी प्रयत्न करुन संबंधितांवर कठोर कारवाई करावी.

Back to top button
Don`t copy text!