नागपूरमध्ये ‘एरो मॉडेलिंग शो’चे आयोजन – क्रीडामंत्री सुनील केदार

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य । दि. २३ फेब्रुवारी २०२२ । मुंबई । राज्यामध्ये अनेक वर्षांनंतर प्रथमच नागपूर येथे एरो मॉडेलिंग शो चे आयोजन करण्यात आले आहे. यामुळे विद्यार्थ्यांना सैन्यदलातील प्रात्यक्षिके पाहायला मिळणार असल्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी सांगितले.

मंत्रालयात एरो मॉडेलिंग शो विषयी आयोजित बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस क्रीडा विभागाचे आयुक्त प्रकाश बकोरिया हे दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.तर कर्नल अमित बाली, ब्रिगेडिअर लाहीरी, कॅप्टन सतपाल सिंग यांची उपस्थिती होती.

क्रीडा मंत्री श्री.केदार म्हणाले, ‘आजादी का अमृत महोत्सव’ अंतर्गत नागपूर शहरातील मोठ्या मैदानात हजारों विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत मोठ्या आकाराचे विमाने(मानव विरहीत) उडविण्यात येणार आहेत. हा शो पाहण्यासाठी राज्यातील विविध ठिकाणाहून विद्यार्थी येणार आहेत. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या शोचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. हा शो क्रीडा विभाग, एनसीसी आणि सैन्य दल यांच्या संयुक्त विद्यमाने होत आहे. याद्वारे विद्यार्थ्यांना एरो माँडलिंगविषयी माहिती होईल व त्याबद्दलचे आकर्षण त्यांच्यामध्ये निर्माण होईल. अशा उपक्रमामुळे सैन्यदलाविषयी, विद्यार्थ्यांना माहिती मिळणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!