आरडगाव भजनी मंडळाचे भजन स्पर्धेत प्रथम क्रमांक

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य । 16 जून 2025 । फलटण । बाळू पाटलाची वाडी येथील बळीराजा फाउंडेशन व खंडाळा तालुका वारकरी संप्रदायांच्या संयुक्त विद्यमाने भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत आरडगाव ता. फलटण येथील भजनी मंडळाने प्रथम क्रमांक मिळविला.

ही भजन स्पर्धा लोणंद येथील सिद्धिविनायक हॉस्पिटलचे डॉ. नितीन सावंत यांच्या पुढाकारातून, तसेच खासदार निलेशजी लंके यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली होती. संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा सन – 2025 या पार्श्वभूमीवर या भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

या स्पर्धेत आरडगाव ता. फलटण येथील भजनी मंडळाने उत्तम सादरीकरण करत प्रथम क्रमांक पटकावला आणि आपल्या गायनकौशल्याने सर्वांची मने जिंकली. मंडळाच्या या यशामुळे गावाचा गौरव मोठ्या अभिमानाने उंचावला आहे.

या यशाबद्दल भजनी मंडळातील सर्व सदस्यांचे विविध स्तरातून कौतुक होत आहे आणि अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!