जल जीवनच्या १४० कामांना मंजुरी, सातारा जिल्ह्यातील प्रत्येक घरात नळाद्वारे पाणी मिळणार – मंत्री शंभूराज देसाई

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. २४ जानेवारी २०२३ । सातारा । जल जीवन मिशनच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व गावांमधील प्रत्येक घरात नळाद्वारे पाणीपुरवठा लवकरच होणार आहे.पाटण तालुक्यातील डोंगरी व दुर्गम भागात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई होती. या भागातील पाणी पुरवठ्यांच्या योजनांना आम्ही प्राधान्य दिले. पाटण तालुक्यातील १४० गावांतील नळ पाणी पुरवठा योजनांचा आज शुभारंभ झाला असून या गावांतील योजनांसाठी निधी मंजूर झाला आहे.या नळ पाणीपुरवठा योजनेमुळे डोंगरी भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई आता दूर होणार आहे. ग्रामीण भागातील लोकांना याचा फायदा होणार आहे . अनेक योजनांच्या माध्यमातून जिल्ह्याच्या विकास कामांसाठी निधी शासनाने दिला. जलजीवन मिशन माध्यमातून पिण्याच्या पाण्यासाठी ही निधी आणला.

पाटण तालुक्यातील एकूण ८८ कोटी ४२ लाख रुपयांच्या १४० नळ पाणी योजनांचे भूमिपूजन करण्यात आले. या माध्यमातून एकूण १ लाख ५३ हजार ३१० लोकसंख्येला पाणी मिळणार आहे. एकूण ३६ हजार ९४१ घरांमध्ये नळ जोडणी देण्यात येणार आहे. या शिवाय तालुक्यातील ३४० गावांमधील नळ पाणी पुरवठा योजनेच्या कामांना कार्यारंभ आदेश देण्यात आले आहेत.


Back to top button
Don`t copy text!